‘एम्.आय.एम्.’ची कृती कट्टरपंथी औरंगजेबासारखीच ! – चंद्रकांत खैरे, शिवसेना
‘एम्.आय.एम्.’च्या अकबरुद्दीन ओवैसींनी घेतले औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन !
संभाजीनगर – संभाजीनगर येथे येऊन ‘एम्.आय.एम्.’चे नेते अकबरुद्दीन ओवैसी हिंदूंच्या शक्तीवर पाय देण्याचा प्रयत्न करत आहेत. जिथे मुसलमान लोकही दर्शनासाठी जात नाहीत, अशा औरंगजेबाच्या कबरीवर अकबरुद्दीन ओवैसी आणि ‘एम्.आय.एम्.’चे खासदार इम्तियाज जलील माथा टेकवतात. यांना कशाला हवा औरंगजेब ? ‘एम्.आय.एम्.’चे नेते काड्या करणारे आणि लोकांना उचकवणारे आहेत, अशी टीका माजी खासदार आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी १२ मे या दिवशी येथे केली.
आमदार अकबरुद्दीन ओवैसी सामाजिक कार्यासाठी येथे दौऱ्यावर आहेत. त्यांनी खासदार इम्तियाज जलील यांच्यासमवेत औरंगजेबाच्या खुलताबाद येथील कबरीचे दर्शन घेतले. याविषयी खैरे म्हणाले, ‘‘संभाजीनगर जिल्ह्याचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न ‘एम्.आय.एम्.’चे नेते करत आहेत, आम्ही त्यांना सोडणार नाही. ‘एम्.आय.एम्.’ची कृती औरंगजेबासारखी आहे. येथे पाय रोवून हिंदु आणि इतर समाज यांना त्रास देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
(सौजन्य : APB MAJHA)
चंद्रकांत खैरे म्हणाले, ‘‘एम्.आय.एम्. कशी आहे हे आम्ही जनतेला दाखवून देऊ. सर्वच दर्ग्यांवर हिंदु-मुसलमान बांधव जातात. आम्ही मुलाचे नाव संभाजी आणि शिवाजी ठेवतो. त्यांचे पूजन करतो. औरंगजेबाच्या कबरीवर इम्तियाज जलील माथा टेकवत आहेत, तर त्यांनी त्यांच्या मुलाचे नाव औरंगजेब का ठेवले नाही ?’’
एम्.आय.एम्., निझाम आणि औरंगजेबाचे विचार एकच ! – अंबादास दानवे, आमदार, शिवसेना
शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे म्हणाले, ‘‘एम्.आय.एम्.च्या नेत्यांनी औरंगजेबाच्या कबरीवर चादर चढवणे यात आश्चर्य नाही. एम्.आय.एम्., निझाम आणि त्याआधीची राजवट यांचे विचार एकच आहेत. धर्मद्रोही, समाजात भांडणे लावणारा, आणि महाराष्ट्र भूमीला तोडणाऱ्या औरंगजेबाच्या कबरीवर चादर चढवली. देशहितवरोधी एम्.आय.एम्.पासून सावधान रहावे. भाजप याच ‘एम्.आय.एम्.’ला साहाय्य करत असून मनसेचे राज ठाकरे आणि एम्.आय.एम्. सारखीच भूमिका वठवत आहेत.’’
‘एम्.आय.एम्.’ने औरंगजेबाची औलाद असल्याचे दाखवून दिले ! – प्रवीण दरेकर, नेते, भाजप
भाजपचे नेते प्रवीण दरेकर म्हणाले, ‘‘अकबरुद्दीन ओवैसी यांनी औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकवून त्यांनी औरंगजेबाची औलाद असल्याचे दाखवून दिले आहे.’’
संपादकीय भूमिकाऔरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या ‘एम्.आय.एम्.’च्या नेत्यांवर पोलिसांनी कारवाई का केली नाही ? |