जयपूर, राजस्थान येथील शिवभक्त पू. वीरेंद्र सोनी (वय ८७ वर्षे) यांचा देहत्याग
जयपूर (राजस्थान) – येथील धर्माभिमानी शिवभक्त श्री. वारिद सोनी यांचे वडील पू. वीरेंद्र सोनी (वय ८७ वर्षे) यांनी १३ मे २०२२ या दिवशी देहत्याग केला. त्यांच्यावर १४ मे या दिवशी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात् ३ मुले, स्नुषा आणि २ नातू असा परिवार आहे. सनातन परिवार सोनी कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी ३० नोव्हेंबर २०२१ या दिवशी पू. वीरेंद्र सोनी यांना संत म्हणून घोषित केले होते. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी वर्ष २०१९ मध्ये केलेल्या कैलास-मानसरोवर (मानससरोवर) यात्रेचे श्री. वारिद सोनी हे मार्गदर्शक होते. पू. वीरेंद्र सोनी हे घरी राहूनच भाव-भक्तीने साधना करत. त्यांनी धर्मग्रंथांचे वाचन करून त्यांना आतून ईश्वराकडून मिळणाऱ्या ज्ञानाच्या आधारे लिखाण केले आहे. त्यांची भगवान शिवावर अचल श्रद्धा होती.