भिवंडी येथील शासकीय अनुदानित शाळेत प्रवेशासाठी ३ सहस्र ५०० रुपयांची मागणी !
मुख्याध्यापकासह तिघेजण कह्यात
ठाणे, १३ मे (वार्ता.) – भिवंडी येथील एका शासकीय अनुदानित शाळेत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ३ सहस्र ५०० रुपयांची मागणी करण्यात आली. या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकांसह तिघांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कह्यात घेतले आहे. मुख्याध्यापक (माध्यमिक) दीपक लेले (वय ५५ वर्षे), मुख्याध्यापक (प्राथमिक) आत्माराम वाघ (वय ५७ वर्षे) आणि शिक्षक सुरेश कुलकर्णी (वय ५२ वर्षे) यांनी लाच मागितल्याचे अन्वेषणाअंती निष्पन्न झाल्याने त्यांना कह्यात घेतले असून त्यांच्याविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (अशा लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना कठोर शिक्षा करायला हवी. – संपादक)