पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिराची मूळ वास्तू पाडण्यास शिवसेनेचा विरोध
पुणे – बालगंधर्व रंगमंदिर पाडून तेथे नाट्यसंकुल उभारण्याविषयी विविध मतप्रवाह पुढे येत आहेत; मात्र बालगंधर्व रंगमंदिराची मूळ वास्तू कायम ठेवून रंगमंदिराचे विस्तारीकरण करावे. रंगमंदिर पाडून तेथे मॉल, बहुउद्देशीय सभागृह आणि छोटी-मोठी ३ नाट्यगृहे बांधण्यास शिवसेनेने विरोध केला आहे. पालिका प्रशासनाने हा प्रस्ताव बळजोरीने लादण्याचा प्रयत्न केल्यास रस्त्यावर उतरण्याची चेतावणी शिवसेनेने दिली आहे. याविषयीचे निवेदन महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना देण्यात आले आहे.