पालकांकडून सक्तीने एकरकमी शुल्कवसुली चालूच !
|
ठाणे, १३ मे (वार्ता.) – अनेक शाळांनी यंदाही शुल्कवाढ करत एकरकमी शुल्क भरण्याचा आग्रह पालकांकडे केला आहे. याविषयी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी शिक्षण विभागाला निवेदन दिले होते. त्यानुसार ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने काढलेल्या परिपत्रकात शाळांना टप्प्याटप्प्याने शुल्क घेण्याचे आदेश दिले आहेत; मात्र तरीही अनेक शाळा जाचक पद्धतीने शुल्कवसुली करत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. याविषयी तीव्र आंदोलन करण्याची चेतावणी मनसेने दिली आहे.
संपादकीय भूमिकाअशी आंदोलनाची चेतावणी का द्यावी लागते ? |