उल्हासनगर येथील व्यापाऱ्याची ६७ लाख ५० सहस्र रुपयांची फसवणूक !
६ जणांवर गुन्हा नोंद
ठाणे, १३ मे (वार्ता.) – भारतीय चलनातून बाद झालेल्या ५ कोटी रुपयांच्या नोटा पालटून देणार असल्याचे सांगत उल्हासनगर येथील मनोहरसिंग प्रकाश ठाकूर या व्यापाऱ्याची ६ भामट्यांनी ६७ लाख ५० सहस्र रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी ठाकूर यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली.
या प्रकरणी पोलिसांनी कपिल कथोरे, त्याचा भाऊ, तसेच अनिल रामचंदानी, नितीन बनसोडे, संजय सावंत उपाख्य भाऊ आणि इम्रान खान अशा ६ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी तक्रारदारावरही कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.