ठाणे (पूर्व) येथे भटक्या कुत्र्यांनी १३ जणांचे लचके तोडले !
आणखी किती जणांना चावा घेतल्यावर प्रशासन जागे होणार आहे ?
ठाणे, १३ मे (वार्ता.) – येथील काही भागांमध्ये भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. धावत्या वाहनांच्या मागे लागून भुंकणे, रस्त्यावरून चालणाऱ्या नागरिकांच्या अंगावर भुंकून त्यांचा चावा घेणे, अशा घटनांमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. ठाणे (पूर्व) येथील अष्टविनायक चौक परिसरात भटक्या कुत्र्याने १३ जणांचे लचके तोडले आहेत.
२ मासांपूर्वी येथील सावरकरनगर भागात पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने ३४ जणांचा चावा घेतला होता. त्यानंतर पुन्हा मनोरमानगरमधील भटके कुत्रे लहान मुलांच्या अंगावर भुंकत होते. ‘प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष घालून यावर ठोस उपाययोजना करावी’, अशी मागणी नागरिक करत आहेत.
संपादकीय भूमिकाअशी मागणी करण्याची वेळ का येते ? प्रशासन स्वतःहून कारवाई का करत नाही ? |