ग्रंथलिखाणाचे अद्वितीय कार्य करणारे एकमेव परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…

परात्पर गुरु डॉक्टरांचे ग्रंथकार्य असामान्य आहे. सनातनचे ग्रंथ वैशिष्ट्यपूर्ण आहेत; म्हणूनच विविध साधनामार्गांनुसार साधना करणारे संत, साधक, तसेच हिंदुत्वनिष्ठ आदींनी या ग्रंथांना गौरवले आहे. १३ मे या दिवशी आपण ‘सनातनचे ग्रंथकार्य हे ईश्वरी कार्यच आहे’, याची येत असलेली प्रचीती, हे सूत्र पाहिले. आज उर्वरित भाग पाहूया. सनातनच्या ग्रंथकार्याचे असे विविध पैलू उलगडणारा हा लेख प्रसिद्ध करत आहोत.  

लेखांक ४  (भाग २)

पू. संदीप आळशी

प्रस्तुत लेखमालेतील सर्व लेख साधकांनी संग्रही ठेवावेत. ग्रंथ प्रदर्शने, ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ इत्यादी प्रसंगी जिज्ञासूंचे प्रबोधन करण्यासाठी या लेखमालिकेत दिलेल्या माहितीचा उपयोग होईल. – संपादक

(या संदर्भातील विस्तृत लिखाण सनातनच्या आगामी ग्रंथात प्रकाशित करण्यात येणार आहे. – संपादक)

संकलक : (पू.) संदीप आळशी (सनातनच्या ग्रंथांचे एक संकलक), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

२. सनातनच्या ग्रंथांचे समाजाला जाणवलेले महत्त्व !

२ अ. ‘कोरोना’ महामारीमुळे ग्रंथविक्रीच्या संदर्भात मर्यादा असूनही ग्रंथांची झालेली प्रचंड विक्री ! : ‘कोरोना’ महामारीमुळे २३ मार्च २०२० पासून जानेवारी २०२२ पर्यंतच्या काळात बहुतांशी भागांत दळणवळणबंदी लागू होती. घरोघरी जाऊन किंवा सार्वजनिक ठिकाणी अध्यात्मप्रसार करण्यास पुष्कळ मर्यादा होत्या. त्यामुळे या काळात सनातनच्या ग्रंथांचे नेहमीप्रमाणे विक्रीकेंद्रांवरून वितरण होऊ शकले नाही. असे असले, तरी ‘sanatanshop.com’, नियतकालिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध होणारी विज्ञापने (जाहिराती), सामाजिक संकेतस्थळांवरील ‘पोस्ट’ इत्यादींच्या माध्यमातून एप्रिल २०२१ ते ऑगस्ट २०२१ या काळात सनातनच्या ८५ सहस्रांहून अधिक ग्रंथ-लघुग्रंथांची विक्री झाली !

२ आ. ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ला लाभलेला वाचकांचा उदंड प्रतिसाद ! : परात्पर गुरु डॉक्टरांच्या अव्यक्त संकल्पामुळे सप्टेंबर २०२१ पासून सनातन संस्थेचा ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ हा राष्ट्रव्यापी उपक्रम चालू झाला. या अभियानाच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत ग्रंथांचा प्रसार होत आहे. समाजातून या अभियानाला अभूतपूर्व प्रतिसादही लाभत आहे. या अभियानाच्या अंतर्गत अवघ्या ७ मासांत (सप्टेंबर २०२१ ते मार्च २०२२) मराठी, हिंदी, कन्नड, गुजराती आणि इंग्रजी या ५ भाषांतील ४ लक्ष १५ सहस्रांहून अधिक ग्रंथ-लघुग्रंथांची विक्री झाली आहे !

वरील माहितीवरून सनातनवर असलेली ईश्वरी कृपा आणि समाजाला वाटणारे सनातनच्या ग्रंथांचे महत्त्वही लक्षात येते.

३. सनातनच्या ग्रंथांविषयी महर्षि आणि संत यांनी काढलेले काही गौरवोद्गार !

३ अ. ‘ईश्वरी नियोजनानुसार हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या नंतर अनंत काळ सनातनचे ग्रंथ वेदांसारखे ‘धर्मग्रंथ’ म्हणून मान्यता पावतील !’ – महर्षि (‘सप्तर्षी जीवनाडीपट्टी’च्या माध्यमातून)

३ आ. ‘सनातनच्या ग्रंथांतील ज्ञान वेदांनुसार आहे !’ – पू. इंद्रवदन शुक्ल, वापी, गुजरात.

३ इ. धर्मप्रमाण ठरणारे सनातनचे ग्रंथ ! : ‘सनातनच्या ग्रंथांमध्ये वेद, उपनिषदे, गीता अन् संतसाहित्य यांची तत्सम प्रमाणवचने घेतल्यामुळे ते विचार अधिक प्रभावी ठरतात.’ – प.पू. डॉ. वासुदेव गिंडे, बेळगाव

३ ई. सुसंस्कृत बनवणारे ग्रंथ ! : ‘सनातनचे ग्रंथ ‘कृण्वन्तो विश्वमार्यम्’ (संपूर्ण जगाला सुसंस्कृत बनवूया !) या ध्येयमार्गावरील दीपस्तंभ आहेत.’ – समर्थभक्त मोहनबुवा रामदासी, सज्जनगड, जिल्हा सातारा.

३ उ. दिशादर्शक ज्ञानगुरु ! : ‘कीर्तनाचा विषय सिद्ध करतांना मी सनातनच्या ग्रंथांचा अभ्यास करतो. सनातनच्या ग्रंथांत मला आवश्यक ती सर्व माहिती मिळते.’ – ह.भ.प. नारायणबुवा लढी, कीर्तनकार, वर्धा.

४. ग्रंथांविषयी काही हिंदुत्वनिष्ठ आणि मान्यवर यांनी काढलेले गौरवोद्गार !

४ अ. समाजाला आवश्यक असणारे ग्रंथ ! : ‘समाजाला आवश्यक असलेल्या सर्वच विषयांवर सनातन संस्थेने ग्रंथ प्रकाशित केले आहेत.’ – श्री. श्रीपाद नाईक, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री, भारत. (वर्ष २०२१)

४ आ. हिंदु ध्वजा जगभर फडकावणारा धर्मदूत ! : ‘सनातनच्या ग्रंथांतील ज्ञानाद्वारे जगभर सनातन हिंदु धर्माचा सुगंध पसरवण्याचे आपले प्रयत्न स्तुत्य असून त्यासाठी आपले अभिनंदन !’ – श्री. दीपक घोष, न्यूयॉर्क

४ इ. धर्माला विज्ञानाची चांगली जोड दिलेले लिखाण असणारे ग्रंथ ! : ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पुष्कळ ग्रंथ लिहिले आहेत. सर्व हिंदूंनी हे ग्रंथ वाचणे आवश्यक आहे. त्यांनी धर्माला विज्ञानाची चांगली जोड दिल्याने सर्वसामान्य व्यक्तीलाही हे ग्रंथ कळण्यास सोपे जाते.’ – आमदार श्री. योगीश भट्ट, मंगळुरू

५. ग्रंथांविषयी आलेल्या काही अनुभूती

५ अ. शंकानिरसन करून समाधान देणारी ग्रंथसंपदा ! : ‘मला त्वचेचा आजार झाल्यावर माझ्या मनाची स्थिती नकारात्मक झाली होती. माझ्या मनात ‘हे माझ्याच संदर्भात का झाले ?’, ‘प्रारब्ध काय असते ?’ इत्यादी प्रश्न येत होते. तेव्हा मी सनातनचा ‘संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण कर्म’ हा ग्रंथ वाचला. त्यानंतर माझ्या मनातील अनेक शंकांचे निरसन झाले आणि मला समाधानही मिळाले.’ – कु. रूपाली कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.११.२०१७)

५ आ. तणावमुक्त करणारी सनातनची ग्रंथसंपदा ! : ‘आध्यात्मिक स्तरावरील उपाय म्हणून सनातनचा ग्रंथ हुंगत राहिल्यामुळे माझ्या मनावरील ताण घटला, तसेच मन:शांतीही मिळाली.’ – डॉ. मंगलकुमार कुलकर्णी, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

५ इ. त्रासनिवारक ग्रंथसंपदा ! : ‘झोपेत विचित्र स्वप्ने पडू लागल्याने रात्री झोप लागेनाशी झाली. सनातनचे ग्रंथ वाचून मग झोपल्यावर स्वप्ने जरी पडली, तरी झोप न लागण्याचा त्रास घटला.’ – श्री. धैवत वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

५ ई. ध्यानासम स्थितीत नेणारी सात्त्विक ग्रंथसंपदा ! : ‘सनातनचा ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन : खंड १’  हा ग्रंथ जवळ घेतल्यावर माझे ध्यान लागल्यासारखे झाले.’ – सौ. ज्योती सोरते, ओहायो, अमेरिका. (१७.६.२०१८)

६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ग्रंथकार्यात सहभागी झाल्याने होणारी शीघ्र आध्यात्मिक उन्नती !

आगामी काळ ‘कोरोना’ महामारीपेक्षाही महाभयानक संकटांचा काळ असणार आहे. या काळात केवळ ‘धर्माचरण आणि साधना’, हेच मानवासाठी तारणहार बनतील. काळानुसार योग्य धर्माचरण आणि कृतीच्या स्तरावरील साधना केवळ सनातनचेच ग्रंथ शिकवतात. यासाठीच आजही परात्पर गुरु डॉक्टर वयाच्या ८० व्या वर्षी प्राणशक्ती अतिशय अल्प असतांनाही ग्रंथकार्य वाढण्यासाठी तळमळीने कार्यरत आहेत. त्यांच्या अव्यक्त संकल्पाने ग्रंथकार्य एवढे उदंड वाढू शकते, तर त्या ग्रंथकार्यात आपण तन, मन आणि धन यांनी सहभागी झालो, तर आपलीही उदंड आध्यात्मिक उन्नती का होणार नाही ?

(समाप्त)

सर्वांना ग्रंथकार्यात सहभागी होण्याची नम्र विनंती !

साधना, हिंदु धर्म, विविध योगमार्ग, ईश्वरप्राप्तीसाठी कला, आध्यात्मिक उपाय, आयुर्वेद, स्वभाषारक्षण अशा विविध विषयांवरील ३५४ ग्रंथ-लघुग्रंथांची निर्मिती सनातनने आतापर्यंत (एप्रिल २०२२ पर्यंत) केली आहे. अजूनही ५,००० हून अधिक ग्रंथ होऊ शकतील एवढे लिखाण संग्रही आहे. हे लिखाण ग्रंथरूपाने प्रसिद्ध होण्यासाठी अनेकांच्या साहाय्याची आवश्यकता आहे. आपली आवड आणि क्षमता यांनुसार लिखाणाचे संकलन, मुद्रितशोधन, संरचना अन् विविध भाषांत भाषांतर करणे या ग्रंथ-निर्मितीच्या सेवांमध्ये आपणही हातभार लावू शकता.

ग्रंथांचा प्रसार करणे, ग्रंथांसाठी अर्पण किंवा विज्ञापने (जाहिराती) देणे किंवा मिळवणे, ग्रंथांचे वितरण करणे आदी सेवांमध्येही आपण सहभागी होऊ शकता. ‘सर्वांनीच या सुवर्णसंधीचा अधिकाधिक लाभ करून घ्यावा !’, ही नम्र विनंती !

यासाठी आम्हाला संपर्क करा – ७०५८८८५६१०

संगणकीय पत्ता : sankalak.goa@gmail.com

ग्रंथ-निर्मितीच्या धर्मसेवेत सहभागी होऊन ईश्वरी कृपा मिळवा !

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक