(म्हणे) ‘काही लोक जात आणि धर्माच्या माध्यमातून द्वेष निर्माण करत आहेत !’ – शरद पवार
‘ईद मिलन’ कार्यक्रमातील वक्तव्य !
पिंपरी-चिंचवड (जिल्हा पुणे) – काही लोक जात आणि धर्माच्या माध्यमातून द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. (‘शरद पवार यांनीच हे आरंभापासून चालू केले’, असे जर अनेकांना वाटत आहे, तर आता हे म्हणण्याचा पवार यांना अधिकार आहे का ? – संपादक) प्रत्येक धर्म हा कुणाचा द्वेष करायला सांगत नाही. धर्म बंधूभाव, विकास सांगतो. (असे असेल, तर धर्मांध वारंवार हिंदूंवर आक्रमण करून सर्व उद्ध्वस्त का करतात ? त्यांचा धर्म विकास सांगत नाही का ? – संपादक) आज देशामध्ये वेगळे वातावरण करण्याचा प्रयत्न काही शक्ती करत आहेत. आम्हाला द्वेष नको, आम्हाला भांडण तंटा नको, आम्हाला विकास पाहिजे, (पवार हे धर्मांधांना दंगली करण्यास भाग पाडणाऱ्या त्यांच्या धार्मिक नेत्यांना जाऊन का सांगत नाहीत ? – संपादक) आम्हाला महागाईमधून सुटका पाहिजे, तरुणांना रोजगार कसा मिळेल ? ही स्थिती निर्माण करायची आहे. देश, राज्य प्रगत कसे होईल, ही स्थिती निर्माण करायची आहे. ते करायचे असेल, तर धार्मिक, भाषिक, यांची एकता अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. ते पिंपरी-चिंचवडमध्ये १२ मे या दिवशी आयोजित केलेल्या राष्ट्रीय एकात्मता स्नेह मेळावा आणि ‘ईद मिलन कार्यक्रमात बोलत होते. या वेळी व्यासपिठावर सर्वधर्मीय धर्मगुरु उपस्थित होते. (सर्वधर्मभावाचे ढोंग करणाऱ्यांच्या कार्यक्रमात जायला हिंदु धर्माच्या धर्मगुरु कशाला जातात ? – संपादक)
संपादकीय भूमिकामंदिरातील मूर्ती तोडणे, मंदिरे उद्ध्वस्त करून त्याजागी मशीद बांधणे हा धर्मांधांचा इतिहास आहे, तर हिंदूंच्या मिरवणुकांवर दगडफेक करणे, दंगल घडवणे, लव्ह जिहादद्वारे महिलांचे, हिंदु तरुणींचे आयुष्य उद्ध्वस्त करणे, थूक जिहाद, लँड जिहाद आदींद्वारे हिंदूंना त्रस्त करणे हा धर्मांधांचा वर्तमान आहे. यावरून द्वेष कोण निर्माण करते, हे स्पष्ट आहे ! |