(म्हणे) ‘या देशाचे हिंदु राष्ट्र होऊ देणार नाही !’ – निखिल वागळे, माजी पत्रकार
सातारा, १२ मे (वार्ता.) – आज देशात प्रतिदिन फाळणी होतांना दिसत आहे. गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या समाजात तेढ निर्माण करण्यासाठी प्रतिदिन द्वेषाची पेरणी केली जात आहे. हे माध्यमांनीच थांबवायला हवे; मात्र आजचे पत्रकार विदूषक झाले आहेत. दोष माध्यमांचा नाही. माध्यमांतून काम करणारे माझ्यासारखे सरपटणारे प्राणी झाले आहेत. ‘द काश्मीर फाईल्स’सारखे चित्रपट दाखवून द्वेष पसरवला जात आहे. त्याला मी विरोध केला. (काश्मिरी हिंदूंवरील अन्याय वागळे यांना अयोग्य न वाटता योग्य वाटतो, असाच याचा अर्थ होत नाही का ? म्हणजे वागळे यांना हिंदूंपेक्षा आतंकवादी जवळचे वाटतात, असे नव्हे का ? अशांनी भारतात कशाला रहायचे, असे भारतियांना वाटले, तर चूक ते काय ? – संपादक) काहीही झाले तरी या देशाचे हिंदु राष्ट्र होऊ देणार नाही, असे प्रतिपादन पत्रकार निखिल वागळे यांनी केले.
जकातवाडी (जिल्हा सातारा) येथील शारदाबाई पवार आश्रमशाळा येथे ‘शाहू-फुले-आंबेडकर’ पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा पुरस्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते वागळे यांना प्रदान करण्यात आला.
संपादकीय भूमिका
|
(म्हणे) ‘धार्मिक तेढ निर्माण करण्याचे कार्य चालू आहे !’ – शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस
या वेळी खासदार शरद पवार म्हणाले की, आज देशातील तळागाळातील माणसाला काय अपेक्षित आहे, ते मिळत नाही. जातीजातींत भांडणे लावली जात आहेत. धार्मिक तेढ निर्माण करण्याचे कार्य चालू आहे. जातीवाद उफाळून आणला जातोय, संघर्षाचा विस्तव फुलवला जातोय. यामध्ये सामान्य माणूस भरडला जातोय. शाहूंसारखा राजा आणि फूलेंसारखा विचारवंत यांची देशाला आवश्यकता आहे. डॉ. आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले. माणसाला त्याचे मूलभूत अधिकार मिळाले पाहिजेत, असे संविधानात लिहून ठेवले आहे. यांच्या नावाने लक्ष्मण माने यांनी पुरस्कार चालू केला आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’, हे ब्रीदवाक्य येथे लागू पडते. या ठिकाणी (लक्ष्मण माने यांच्या आश्रमशाळेत) ब्रह्मा, विष्णु आणि महेश घडवण्याचे काम केले जाते.
संपादकीय भूमिकाओवैसी हिंदूंना १५ मिनिटांत संपवण्याची भाषा करतात, तेव्हा शरद पवार यांना धार्मिक तेढ निर्माण होते असे वाटत नाही, रझा अकादमी दंगल करते, तेव्हा पवार यांना धार्मिक तेढ निर्माण होते असे वाटत नाही, हिंदूंच्या मिरवणुकांवर आक्रमणे होतात, तेव्हा धार्मिक तेढ निर्माण होते, असे पवार यांना वाटत नाही. अर्थात् मुंबईत बाँबस्फोट झाल्यावर जाणूनबुजून मुसलमानांच्या वस्तीतही बाँबस्फोट झाल्याची आवई उठवणाऱ्या शरद पवारांकडून दुसरी काय अपेक्षा करणार ? |