हिंदु समाजाने प्रतिकार केल्याविना सणांच्या वेळी होणारी जिहादी आक्रमणे थांबणार नाहीत ! – अधिवक्ता मोतीसिंह राजपुरोहित, राजस्थान उच्च न्यायालय
हिंदु नववर्ष, रामनवमी, हनुमान जयंती आदी हिंदूंच्या सणांच्या वेळी देशभरात काढण्यात आलेल्या मिरवणुकांवर जिहादी प्रवृत्तींकडून भीषण आक्रमणे करण्यात आली. या हिंदु-मुसलमान दंगली नव्हत्या, तर आतंकवादी प्रवृत्तीच्या जिहाद्यांकडून सुनियोजित पद्धतीने झालेली एकतर्फी आक्रमणे होती. करौली येथील आक्रमणात सहभागी असणारे राजस्थान सरकारमधील सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी आणि अन्य जिहादी यांची माहिती प्रसिद्धीमाध्यमे अन् लोकांनी तक्रारी करून दिल्यावरही त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही. याउलट सरकारच त्यांचा बचाव करत आहे, असे जाणवते. जो तीव्र प्रतिकार आणि विरोध करतो, त्याचेच म्हणणे सरकार अन् न्यायालय ऐकते. त्यामुळे जोपर्यंत बहुसंख्यांक हिंदु समाज अशा आक्रमणांना योग्य प्रतिकार आणि विरोध करत नाही, तोपर्यंत या घटना थांबणार नाहीत.