अविस्मरणीय असा परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ७९ वा जन्मोत्सव सोहळा पहातांना सोलापूर जिल्ह्यातील साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
२.५.२०२१ या दिवशी महर्षींच्या आज्ञेनुसार रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ७९ वा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम सर्व ठिकाणच्या साधकांना पहाता यावा, यासाठी हा सोहळा ध्वनीचित्र-चकतीच्या माध्यमातून दाखवण्यात आला. हा कार्यक्रम पाहून सोलापूर जिल्ह्यातील साधकांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
– (पू.) कु. दीपाली मतकर, सोलापूर
१. सौ. दीपाली सचिन जाधव, बारामती
१ अ. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले घरी येणार आहेत’, असा भाव ठेवल्याने भावजागृती होणे आणि त्या वेळी सुतक असल्याने सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉक्टरांच्या स्वागताची सेवा करणे : ‘मला जन्मोत्सव सोहळ्याच्या दिवशी पुष्कळ चैतन्य जाणवत होते. मी प्रत्येक कृती करतांना ‘परात्पर गुरु डॉक्टर घरी येणार आहेत’, असा भाव ठेवला होता. त्यामुळे माझी भावजागृती होत होती. त्या दिवशी आम्हाला सुतक होते. त्यामुळे ‘मला स्थुलातून परात्पर गुरु डॉक्टरांच्या स्वागताची सेवा करता येणार नाही’, अशी खंत वाटत होती. त्या वेळी गुरुदेवांनी मला मानस सिद्धता करण्याचा विचार सुचवला. ‘स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ आहे’, असा विचार करून मी सूक्ष्मातून रांगोळी काढली आणि गुरुदेवांची भावपूर्ण पाद्यपूजा केली. या सर्व कृती करतांना मला आनंद मिळत होता.
१ आ. सोहळ्याच्या वेळी पुष्कळ भावजागृती होणे आणि ‘वर्ष २०२५ मध्ये हिंदु राष्ट्र्र येणार’, याची निश्चिती होणे : सोहळ्याच्या वेळी माझी पुष्कळ भावजागृती झाली. ‘रामाचा अभिषेक चालू असतांना मी प्रत्यक्ष तेथे आहे’, असेच जाणवत होते. या सोहळ्यामुळे ‘वर्ष २०२५ मध्ये ‘हिंदु राष्ट्र’ येणार’, याविषयी माझी निश्चिती झाली. माझी पात्रता नसतांनाही केवळ गुरुदेवांच्या कृपेमुळे मला हे अनुभवता आले.’
२. सौ. लता जेऊरकर, भारती विद्यापीठ
२ अ. सोहळ्याच्या वेळी सर्व सेवा सहजतेने आणि वेळेत पूर्ण होेणे अन् नामजपादी उपायही पूर्ण होऊन शांत वाटणे : ‘पूर्वी माझ्याकडून कार्यक्रमाचे कितीही नियोजन केले, तरीही सेवा पूर्ण होत नसत. सोहळ्याच्या दिवशी सकाळपासूनच मला पुष्कळ चैतन्य जाणवत होते. माझ्याकडून सर्व सेवा सहजतेने पूर्ण होत होत्या. ‘गुरुमाऊलीच मला सूक्ष्मातून साहाय्य करत आहेत’, असे जाणवत होते. या वेळी प्रथमच माझ्याकडून नामजपादी उपाय पूर्ण करण्याचे प्रयत्न झाले आणि मला आतून फार शांत जाणवत होते.’
३. सौ. वंदना जोशी, भारती विद्यापीठ
३ अ. ‘हा सोहळा दैवी वातावरणात साक्षात् श्रीविष्णुसमोर बसून अनुभवत आहे’, असे जाणवणे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांना पहातांना भान हरपणे : ‘२.५.२०२१ या दिवशी परात्पर गुरु डॉक्टरांचा जन्मोत्सव सोहळा आहे’, हा निरोप मिळताच माझे मन आनंदी आणि भावविभोर झाले. सोहळ्याच्या आदल्या दिवशी सोहळा बघण्याची पूर्वसिद्धता करतांना अनेक अडचणी येत होत्या, तरीही मन दुसऱ्या दिवसाच्या सोहळ्याची आतुरतेने वाट पहात होते. गुरुदेवांनीच सर्व सिद्धता करवून घेतली आणि हा दिव्य सोहळा निर्विघ्नपणे अन् भावपूर्ण वातावरणात अनुभवता आला. या वेळी ‘त्या दैवी वातावरणात साक्षात् श्रीविष्णुसमोर बसून मी हा सोहळा अनुभवत आहे’, असे मला जाणवत होते. गुरुदेवांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) पहातांना माझे भान हरपल्यासारखे झाले.’ (क्रमश:)
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक २५.६.२०२१)
|