भारतात विरोधी पक्ष दुर्बल ! – श्री श्री रविशंकर
वाशिंग्टन (अमेरिका) – भारताला कणखर आणि रचनात्मक विचार करणार्या विरोधी पक्षाची आवश्यकता आहे. सध्याचे विरोधक अत्यंत दुर्बल आहेत. त्यामुळे सत्तास्थानावरील नेता निरंकुश वाटू शकतो; परंतु प्रत्यक्षात तसे नाही, असे प्रतिपादन ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ या आध्यात्मिक संस्थेचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांनी केले. केंद्रीय स्तरावर नेतृत्वाचा अभाव असल्यास ‘लोकशाही’ ही लोकशाही वाटत नाही. देशात न्यायव्यवस्था प्रबळ आहे, त्याविषयी काही शंका घेता येत नाही, असेही ते म्हणाले.
Observing that the national Opposition in the country is weak, spiritual leader Sri Sri Ravi Shankar said he believes that for a healthy democracy, it is essential that India has a stronger Opposition, one that is constructive as wellhttps://t.co/5OqVO31tfO
— Hindustan Times (@htTweets) May 12, 2022
श्री श्री रविशंकर हे सध्या २ मासांच्या अमेरिकेच्या दौर्यावर आहेत. त्यानिमित्ताने झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी वरील प्रतिपादन केले.