हेरगिरीच्या प्रकरणी भारतीय वायूदलाच्या सैनिकाला अटक
महिलेच्या जाळ्यात अडकून पाकला दिली संवेदनशील माहिती !
नवी देहली – देहली पोलिसांनी हेरगिरीच्या प्रकरणी भारतीय वायूदलातील सैनिक देवेंद्र याला अटक केली. या हेरगिरीमागे पाकची गुप्तचर संस्था आय.एस्.आय.चा हात असल्याचे सांगितले जात आहे. देवेंद्र याची सामाजिक माध्यमांवर एका महिलेशी मैत्री झाली. तो या महिलेशी भ्रमणभाषवर अश्लील संदेशांद्वारे संवाद साधत होता. याच वेळी तो तिच्या जाळ्यात अडकला आणि त्याने वायूदलाची संवेदनशील माहिती या महिलेला पुरवली. पोलिसांच्या तपासात देवेंद्रच्या पत्नीच्या बँक खात्यात काही संशयास्पद आर्थिक व्यवहार आढळून आले आहेत.
Delhi Police arrest honey-trapped Indian airforce sergeant for leaking sensitive Info
Read @ANI Story | https://t.co/9G0qBtzXcR#honeytrapping #DelhiPolice #IAFsergeant #IndianAirForce pic.twitter.com/CRaD0UZ2fD
— ANI Digital (@ani_digital) May 12, 2022
पोलिसांच्या मते, देवेंद्र याच्याकडून ‘वायूदलाचे किती रडार तैनात आहेत? तसेच वायूदलाच्या वरिष्ठ अधिकार्यांची नावे, त्यांचा पत्ता काय ?’ आदी माहिती मिळवण्याचा प्रयत्न या महिलेकडून करण्यात आला.
संपादकीय भूमिकाअशा सैनिकांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे, म्हणजे अन्य कुणाचे अशी चूक करण्याचे धाडस होणार नाही ! |