ताजमहाल कुणी बांधला यावर तुम्हीच संशोधन करा !
ताजमहाल प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली !
प्रयागराज (उत्तरप्रदेश) – ताजमहाल शहाजहानने बांधला नाही, यावर तुमचा विश्वास आहे ? आम्ही येथे निकाल देण्यासाठी आलो आहोत का ? की ‘तो कुणी बांधला किंवा ताजमहालचे वय किती आहे ?’ तुम्हाला ठाऊक नसलेल्या विषयावर संशोधन करा, एम्.ए. करा, पी.एच्डी. करा. जर कुठली संस्था तुम्हाला संशोधन करू देत नसेल, तर आमच्याकडे या. या याचिकेची सुनावणी आम्ही पुढे ढकलणार नाही, अशा शब्दांत अलहाबाद उच्च न्यायालयाने ताजमहालमधील बंद असलेल्या २२ खोल्या उघडून त्यांची पडताळणी करण्याची मागणी करणार्या याचिकेवर याचिकाकर्त्याला फटकारत ही याचिका फेटाळून लावली. यानंतर याचिकाकर्त्यांनी या निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
Lucknow bench of the Allahabad High Court dismissed a plea seeking to open 22 closed rooms in the Taj Mahal. https://t.co/MCx4ZsZMAH
— Hindustan Times (@htTweets) May 12, 2022
यावर याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला सांगितले, ‘आम्ही प्राधिकरणाकडून माहिती मागवली आहे.’ त्यावर न्यायालयाने म्हटले, ‘जर त्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव खोल्या बंद असल्याचे सांगितले असेल, तर ती योग्य माहिती आहे. यामुळे तुमचे समाधान होत नसेल, तर आव्हान द्या. जनहित याचिका प्रणालीचा गैरवापर करू नका.
संपादकीय भूमिका
|