मंत्रीमंडळाची बैठक चालू असतांना मंत्रालयातील वीजपुरवठा खंडित !
मुंबई, ११ मे (वार्ता.) – मंत्रीमंडळाची बैठक चालू असतांना ११ मे या दिवशी मंत्रालयातील वीजपुरवठा खंडित झाला. सायंकाळी ५.३१ वाजता गेलेली वीज ५.३९ वाजता आली. ८ मिनिटे संपूर्ण मंत्रालयातील वीजपुरवठा खंडित होता. मंत्रालयाला बेस्टकडून वीजपुरवठा होतो. वीजपुरवठा खंडित झाल्याने मंत्रालयातील सर्व विभागांचे संगकीय कामकाज ठप्प झाले. बेस्टकडून झालेला वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे हा वीजपुरवठा खंडित झाला होता.