माझ्यावर गुन्हे नोंद करण्यामागे राजकीय षड्यंत्र ! – गणेश नाईक, आमदार, भाजप
नवी मुंबई – माझ्यावर गुन्हे नोंद करण्यामागे राजकीय षड्यंत्र आहे, असा आरोप भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी केला आहे. निवडणुकांमुळे माझी प्रतिमा मलीन करण्याचा विरोधकांचा डाव आहे, असे गणेश नाईक यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना सांगितले.
एका महिलेने गणेश नाईक यांच्यावर बलात्कार करणे आणि धमकावणे या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती. त्यावर उच्च न्यायालयाने नाईक यांना अटकपूर्व जामीन दिला आहे. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
गणेश नाईक यांनी आरोप केला आहे की, नवी मुंबईतील जनतेने मला गेली २५ वर्षे सत्तेत ठेवल्याने राजकीयदृष्ट्या महानगरपालिका जिंकणे विरोधकांना शक्य झाले नाही. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर माझ्याविरोधात षड्यंत्र रचून माझे चारित्र्य बिघडवण्याचा विरोधकांचा डाव आहे.