बहुजन विकास आघाडीकडून राज्य निवडणूक आयोगाला नोटीस !
मुंबई – सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्यावरून बहुजन विकास आघाडीकडून राज्य निवडणूक आयोगाला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका २ आठवड्यांत घोषित कराव्यात, असे निर्देश ४ मे या दिवशी सर्वाेच्च न्यायालयाने दिले होते; मात्र अद्याप निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केलेला नाही. त्यामुळे ही नोटीस पाठवण्यात आली आहे.