सनातनच्या ग्रंथांतील ज्ञानाचा विविध माध्यमांतून होणारा व्यापक प्रसार !
सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…
ग्रंथलिखाणाचे अद्वितीय कार्य करणारे एकमेव परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !
परात्पर गुरु डॉक्टरांच्या व्यापक ग्रंथकार्याच्या संदर्भातील विविध पैलूंची माहिती देणारी ही लेखमालिका त्यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त प्रसिद्ध करत आहोत. ११ मे २०२२ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ग्रंथांतील ज्ञान ‘नियतकालिके, संकेतस्थळे, सामाजिक प्रसारमाध्यमे इत्यादी माध्यमांतून भारतभर आणि जगभर कसे पोचत आहे’, याविषयी पाहिले. आज या लेखाचा उर्वरित भाग पाहूया !
लेखांक ३ (भाग २)
संकलक : (पू.) संदीप आळशी (सनातनच्या ग्रंथांचे एक संकलक), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा. https://sanatanprabhat.org/marathi/578727.html |
५. ‘डिजिटल’ तंत्रज्ञानाद्वारे ग्रंथांतील ज्ञानाला प्रसिद्धी
५ अ. संकेतस्थळांद्वारे प्रसिद्धी
१. Sanatan.org (मराठी, हिंदी, कन्नड, तमिळ, तेलुगु, गुजराती, मल्याळम्, नेपाळी आणि इंग्रजी या भाषांत)
२. Hindujagruti.org (मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांत)
३. Balsanskar.com (मराठी, हिंदी, इंग्रजी आणि कन्नड या भाषांत)
४. Spiritualresearchfoundation.org (इंग्रजी, चिनी, पारंपरिक चिनी, फ्रेंच, दॉईश [जर्मन], डच, स्पॅनिश, क्रोएशियन, सर्बियन, रशियन, स्लोव्हेन्सिना, मलय [मलेशियन], इटालियन, इग्बो, हंगेरियन, पोर्तुगीज, इंडोनेशियन, मॅसडोनियन, बल्गेरीयन, व्हिएतनामी, रोमाना आणि नेपाळी या २२ विदेशी भाषांत, तसेच हिंदी आणि तमिळ या २ भारतीय भाषांत)
५. Spiritual.university (Maharshi University of Spirituality) : इंग्रजी भाषेत
५ आ. ‘यू ट्यूब’द्वारे प्रसिद्धी : ‘www.youtube.com/Dharmashikshan’ या मार्गिकेवरील (‘लिंक’वरील) ‘धर्मशिक्षा’ वाहिनीवर (‘चॅनेल’वर) ‘गुढी कशी उभारावी ?’, ‘गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आदी कसे साजरे करावेत ?’, ‘होळीचे पूजन कसे करावे ?’ यांसारख्या विषयांवरील मराठी, हिंदी, बंगाली, गुजराती, कन्नड, तेलुगु, मल्ल्याळम् आणि तमिळ या भाषांतील दृश्यपट (व्हिडिओ) उपलब्ध आहेत. ११.५.२०११ या दिवशी चालू झालेल्या या ‘यू ट्यूब वाहिनी’ला भेट दिलेल्यांची संख्या ९ एप्रिल २०२२ पर्यंत ३३ लक्ष ५७ सहस्रांहून अधिक आहे.
५ इ. सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे (‘सोशल मीडिया’द्वारे) प्रसिद्धी : ‘ट्विटर’, ‘व्हाट्सॲप’ आणि ‘टेलिग्राम’ या सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे सनातनच्या ग्रंथांतील लिखाण प्रतिमास सहस्रावधी लोकांपर्यंत पोचते.
५ ई. ‘ॲन्ड्रॉइड ॲप्स्’द्वारे प्रसिद्धी : ‘बालसंस्कार’, ‘हिंदु जनजागृती समिती’, ‘सनातन संस्था’, ‘सनातन प्रभात नियतकालिक’, ‘आपत्कालीन सुरक्षा’ आणि ‘श्राद्धविधी’ या ‘ॲन्ड्रॉइड ॲप्स्’द्वारेही सनातनच्या ग्रंथांतील लिखाण प्रतिमास सहस्रावधी लोक वाचतात.
६. ग्रंथ वाचकांपर्यंत पोचवण्यासाठी आधुनिक सुविधांचा वापर !
६ अ. Sanatanshop.com च्या माध्यमातून ग्रंथविक्री ! : या संकेतस्थळावरून सनातनची ग्रंथसंपदा भारतभरात कुठेही ‘ऑनलाईन’ विकत घेता येते.
६ आ. ग्रंथ ‘ई-बूक’ स्वरूपात उपलब्ध ! : ‘ई-बूक’ म्हणजे, एखाद्या पुस्तकाचे ‘डिजिटल’ किंवा ‘इलेक्ट्रॉनिक’ स्वरूपातील रूपांतर. सध्या इंग्रजी भाषेत ‘स्वभावदोष (षड्रिपू)-निर्मूलनाचे महत्त्व आणि गुण-संवर्धन प्रकिया’ हा ग्रंथ आणि हिंदी भाषेत ‘सण साजरे करण्याच्या योग्य पद्धती आणि शास्त्र’ असे दोन ग्रंथ ‘ई-बूक’ स्वरूपात उपलब्ध आहेत. सनातनचे अन्य ग्रंथही ‘ई-बूक’ स्वरूपात लवकरच उपलब्ध होणार आहेत.
७. ‘राष्ट्रीय पुस्तक न्यासा’कडून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ग्रंथप्रदर्शनांमध्ये सनातनच्या ग्रंथांचा समावेश !
भारताच्या शिक्षण मंत्रालयाच्या ‘राष्ट्रीय पुस्तक न्यासा’च्या (‘नॅशनल बूक ट्रस्ट’च्या) वतीने भारतात आणि जगात ग्रंथप्रदर्शने आयोजित केली जातात. वर्ष २००४ पासून भारतातील ग्रंथप्रदर्शनांमध्ये सनातनच्या ग्रंथांना स्थान दिले जाते. वर्ष २०२१ पासून विदेशांतील ग्रंथप्रदर्शनांमध्येही सनातनचे ग्रंथ उपलब्ध करण्यात येतात. या वर्षी (वर्ष २०२२ मध्ये) १३ देशांतील ग्रंथप्रदर्शनांत सनातनचे ग्रंथ उपलब्ध असतील. (क्रमश:)
प्रस्तुत लेखमालेतील सर्व लेख साधकांनी संग्रही ठेवावेत. ग्रंथ प्रदर्शने, ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ इत्यादी प्रसंगी जिज्ञासूंचे प्रबोधन करण्यासाठी या लेखमालिकेत दिलेल्या माहितीचा उपयोग होईल. – संपादक
(या संदर्भातील विस्तृत लिखाण सनातनच्या आगामी ग्रंथात प्रकाशित करण्यात येणार आहे. – संपादक)
सनातनच्या ग्रंथांचा प्रसार करून ईश्वरी कृपेस पात्र व्हा !१. सनातनचे ग्रंथ वाचा आणि इतरांनाही वाचायला प्रवृत्त करा ! २. घरगुती समारंभांच्या वेळी (उदा. व्रतबंध, विवाह, साठीशांती) सनातनचे ग्रंथ भेट म्हणून द्या ! ३. सनातनच्या ग्रंथांचे प्रायोजक बना आणि शाळा, गं्रथालये आदींना ग्रंथसंच भेट द्या ! ४. ‘धर्मकार्यार्थ अर्पण’ म्हणून सनातनच्या ग्रंथांसाठी विज्ञापने (जाहिराती) द्या ! ५. Sanatanshop.com आदी संकेतस्थळांवर असणारी ग्रंथांविषयीची माहिती स्वतःच्या सामाजिक संकेतस्थळांवर (उदा. ‘व्हॉट्सॲप’, ‘फेसबूक’ यांवर) देऊन ग्रंथांचा प्रसार करा ! ६. आपल्या परिसरातील सार्वजनिक उत्सव, सार्वजनिक सभा इत्यादींच्या वेळी सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यासाठी सनातनच्या साधकांशी संपर्क करा. ७. आपल्या परिसरातील ‘पुस्तक प्रदर्शना’मध्ये सनातनचेही ग्रंथ ठेवले जाण्यासाठी प्रयत्न करा ! ग्रंथप्रसाराच्या या पवित्र धर्मसेवेत सहभागी व्हा आणि ईश्वरी कृपा संपादन करा ! |