राजस्थानमध्ये अनुसूचित जातींतील लोकांसाठी विनामूल्य आयुवेर्दिक चकित्सा शिबिराचे आयोजन !

जयपूर (राजस्थान) – राज्यातील राष्ट्रीय आयुर्वेद संस्थानाच्या वतीने अनुसूचित जातींतील लोकांसाठी २३ ते २७ मे या कालावधीत विनामूल्य आयुवेर्दिक चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सरकारी स्तरावरच याची व्यवस्था करण्यात आली आहे.

राज्यातील अनेक गावांमध्ये विविध जातींचे लोक रहात आहेत. मग अन्य जातींतील रुग्ण शिबिरात आले, तर त्यांना विनाउपचार परत पाठवून दिले जाईल का ?, असा प्रश्‍न विचारला जात आहे. यावर ‘राष्ट्रीय आयुर्वेद संस्थान’चे निर्देशक संजीव वर्मा म्हणाले की, अशा शिबिरांसाठी केंद्र सरकारकडून विशेष निधी पुरवला जातो. त्यामुळेच राज्य सरकारकडून गावांतील अनुसूूचित जातींच्या लोकांसाठी अशी शिबिरे भरवण्यात येणार आहेत. अन्य जातींतील लोकांसाठी सामान्य शिबिरांचे आयोजन करण्यात येत असते.

संपादकीय भूमिका

अशी शिबिरे सर्वांसाठीच उपयुक्त असल्याने ती सर्वांसाठीच का आयोजित केली जात नाहीत ?