ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाप्रकरणी युक्तीवाद पूर्ण : आज निर्णय !
वाराणसी (उत्तरप्रदेश) – येथील ज्ञानवापी मशीद आणि शृंगारगौरी देवी मंदिर यांच्या सर्वेक्षणाच्या संदर्भातील दिवाणी न्यायालयात चालू असलेली पूर्ण झाली असून त्यावर १२ मे या दिवशी दुपारी १२ वाजता न्यायालयाकडून निर्णय देण्यात येणार आहे.
#BreakingNews:
उत्तर प्रदेश: वाराणसी कोर्ट ने ज्ञानवापी मस्जिद सर्वेक्षण मामले में कल के लिए आदेश सुरक्षित रखा pic.twitter.com/bcBPGj6soo— LEGEND NEWS (@LegendNewsin) May 11, 2022
११ मे या दिवशी झालेल्या सुनावणीच्या वेळी मुसलमान आणि हिंदु पक्ष यांच्या अधिवक्त्यांकडून युक्तीवाद पूर्ण करण्यात आल्यानंतर न्यायालयाने १२ मे या दिवशी निर्णय देणार असल्याचे सांगितले. यामध्ये ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण आणि चित्रीकरण कधी आणि केव्हा करायाचे यावर, तसेच न्यायालय आयुक्त पालटायचे का ? यावर निर्णय दिला जाणार आहे.