नांदेड, मनमाड आणि नवी मुंबई येथे खलिस्तानी आतंकवाद्यांचे छुपे गट सक्रीय !
महाराष्ट्र पोलिसांच्या हाती लागली माहिती
मुंबई – महाराष्ट्रात घातपात घडवून आणण्याचा प्रयत्न आतंकवाद्यांनी चालू केला आहे. नांदेड, मनमाड आणि नवी मुंबई यांवर सुरक्षा यंत्रणांचे विशेष लक्ष आहे. या तीन भागांमध्ये खलिस्तानी आतंकवाद्यांचे छुपे गट (स्लीपर सेल) सक्रीय आहेत. या गटाच्या माध्यमातून सामान्य लोकांमध्ये ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, अशी माहिती महाराष्ट्र पोलिसांच्या हाती लागली आहे. खलिस्तानवादी आतंकवादी हरविंदर सिंह रिंदा याच्याशी संबंधित काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. हरियाणातील कर्नाल येथे अटक करण्यात आलेल्या आतंकवाद्यांचा ताबा महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथक घेणार असल्याचे समजते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
खलिस्तानी दहशतवाद्यांनी राज्यातील या शहरात स्लीपर सेल सक्रीय केल्याची माहिती आहे#Khalistani #KhalistanTerrorist #Mumbai #MaharashtraPolice #ATS https://t.co/lGWEW7TKiO
— ABP माझा (@abpmajhatv) May 11, 2022
१. नांदेड ते पंजाब येथील अनेक भागांमध्ये खलिस्तानवाद्यांचे ‘स्लीपर सेल’ कार्यरत आहे. या माध्यमातून युवकांना खलिस्तानी उदिष्टांसाठी सिद्ध करण्यात येत आहे.
२. नवी मुंबईतील एक युवक सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आहे. तो शीख धर्मीय नसूनही शीख धर्माचा प्रचार-प्रसार करत आहे. नवी मुंबईतील काही नागरिकांना घेऊन तो देहलीतील शेतकरी आंदोलनात सहभागी झाला होता.