भावी पतीचा गुन्हा समजल्यावर महिला उपनिरीक्षकाकडून त्याला अटक
गौहत्ती (आसाम) – नागांव जिल्ह्यात महिला उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असणार्या जुनमोनी राभा यांना त्यांच्या होणार्या पतीने केलेल्या गुन्ह्यांची माहिती मिळाल्यावर त्यांनी त्याला अटक करून कारागृहात टाकले. त्यामुळे राभा यांचे कौतुक केले जात आहे. फसवणुकीच्या प्रकरणी ही अटक करण्यात आली आहे.
Junmoni Rabha Assam : कौन है जुनमोनी राभा, जिन्होंने शादी से पहले अपने ही मंगेतर को भेजा जेल #junmonirabha #जुनमोनीराभा #assam #असम #गुवाहाटी https://t.co/P0sHB2AYPR
— Oneindia Hindi (@oneindiaHindi) May 6, 2022
राभा यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले की, गेल्या वर्षी ऑक्टोबर मासामध्ये राणा पोगागशी मी साखरपुडा केला आणि येणार्या नोव्हेंबर मासामध्ये विवाह करणार होते.
तथापि मला समजले की, राणा याने ‘ऑईल इंडिया लिमिटेड’चा जनसंपर्क अधिकारी असल्याचे सांगून अनेकांना नोकर्या देण्याचे आश्वासन देऊन फसवले आहे. मी त्या तिघांची ऋणी आहे, जे राणा पोगगविषयीची माहिती घेऊन माझ्याकडे आले आणि त्याची सत्यता मला सांगितली. त्यांनी माझे डोळे उघडले.
संपादकीय भूमिकाअसे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारीच खर्या अर्थाने कायद्याचे आणि जनतेचे रक्षण करतात ! |