दंगली न होण्यासाठी पोलीस आणि सरकारी यंत्रणांकडून कारवाई झाली पाहिजे ! – अधिवक्ता युधवीरसिंह चौहान, देहली उच्च न्यायालय
देहली येथे नुकतीच झालेली दंगल हे आपल्या यंत्रणेचे मोठे अपयश आहे. पुढे अशा प्रकारच्या दंगली किंवा आक्रमणे होणार नाहीत, अशा प्रकारचे अन्वेषण आणि कारवाई पोलीस अन् सरकारी यंत्रणांकडून झाली पाहिजे. दंगली घडवणारे जे अवैधरित्या या देशात रहात आहेत, त्यांची ठिकाणे, तसेच त्यांचे आर्थिक स्रोत काय आहेत ? याच्या मुळापर्यंत सरकारने पोचणे आवश्यक आहे.