ज्ञानवापी मशिदीच्या भिंतीवर घंटा आणि स्वस्तिक अस्तित्वात ! – चित्रीकरण करणार्याचा दावा
वाराणसी (उत्तरप्रदेश) – दिवाणी न्यायालयाच्या आदेशाने येथील ज्ञानवापी मशीद आणि शृंगारगौरी मंदिराचे सर्वेक्षण अन् चित्रीकरण करण्यात येणार आहे. यातील काही भागाचे सर्वेक्षण आणि चित्रीकरण करण्यात आले आहे. न्यायालय आयुक्तांच्या उपस्थितीत हे चित्रीकरण करणारे विभाष दुबे यांनी ‘आज तक’ या वृत्तवाहिनीशी बोलतांना दावा केला की, त्यांनी ज्ञानवापी मशिदीच्या भिंतींवर प्राचीन घंटा आणि फुलाच्या लड्या पाहिल्या, तसेच त्यांना दोन स्वस्तिसकही दिसून आले. यासह शृंगारगौरी मंदिराच्या खाली शेषनाग आणि कमळही दिसून आले.
उत्तर और पश्चिम से सर्वे शुरू हुआ, खुरेच कर हटाने वाली बात गलत है, धूल ही हटाई गई रिकॉर्ड करने के लिए।
ज्ञानवापी सर्वेक्षण के प्रत्यक्षदर्शी और वीडियोग्राफर विभाष दुबे का सुपर एक्सक्लूसिव इंटरव्यू। #GyanvapiMasjid #ReporterDiary
(@iSamarthS) pic.twitter.com/OtnFO7KeP2— AajTak (@aajtak) May 11, 2022
दुबे म्हणाले की, भिंतीवर नखांद्वारे ओरखडे काढण्यात आल्याची बातमी चुकीची आहे. चित्रीकरण करण्यासाठी भिंतीवरील धूळ हटवण्यात आली होती. ६ मे या दिवशी आम्हाला विरोध झाला नाही; मात्र दुसर्या दिवशी जेव्हा आम्ही तेथे गेलो, तेव्हा घोषणाबाजी करण्यात आली. १०० हून अधिक लोकांनी आम्हाला विरोध केला. न्यायालय आयुक्तांनी आत जाऊ देण्यास सांगितले; मात्र मुसलमान पक्षाचे अधिवक्ता गप्प राहिले.