वारकर्यांनी धर्मरक्षणासाठी समाजप्रबोधन करण्याची आवश्यकता ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती
दापोली, ९ मे (वार्ता.) – आज मंदिरांचे सरकारीकरण झाल्याने मंदिरांच्या भूमीची आणि धनाची लूट चालू आहे. आमच्या शेकडो वर्षांच्या परंपरा मोडीत काढल्या जात आहेत. तसेच गोहत्या, लव्ह जिहाद, हलाल जिहाद अशी विविध संकटे आज हिंदु समाजावर घोंगावत आहेत. याविषयी प्रत्येक हिंदूला जागृत करणे आवश्यक आहे आणि ते सामर्थ्य वारकर्यांमध्ये आहे. त्यामुळे वारकर्यांनी धर्मरक्षणासाठी समाजप्रबोधन करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी केले. दापोली तालुका वारकरी संप्रदाय आयोजित वारकरी मेळाव्यात ते बोलत होते.
हा प्रबोधनाचा विषय समाजापर्यंत पोचवण्यासाठी गावागावांत छोट्या सभा होणे आवश्यक आहे. त्याचसमवेत हिंदूऐक्य आणि हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दिशेने अत्यंत महत्त्वाचे पाऊल म्हणून १५ मे २०२२ या दिवशी चिपळूण येथील होणार्या हिंदू एकता दिंडीत सर्वांनी आपला परिवार, नातेवाईक आणि मित्रमंडळी यांसह सहभागी होण्याचे आवाहन श्री. खाडये यांनी या वेळी केले.
सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने . . .
१५ मे या दिवशी चिपळूण येथे होणार्या हिंदू एकता दिंडीत सहभागी व्हा !
श्री. मनोज खाडये यांचा सत्कार दापोली तालुका वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष ह.भ.प. किशोर महाराज चौगुले यांनी केले. सूत्रसंचालन सचिव ह.भ.प. नंदकुमार महाराज कालेकर यांनी केले. या वेळी ह.भ.प. सदाशिव महाराज जाधव, ह.भ.प. मधुकर महाराज पावशेे, ह.भ.प. श्रावण महाराज पाटील, ह.भ.प. सुरेश महाराज काते, ह.भ.प. केशव महाराज भुवड आणि अन्य वारकरी बांधव उपस्थित होते .