उल्हासनगर महानगरपालिकेत कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांची दादागिरी !
देयकासाठी मुख्यालयातील लिपिकाला मारहाण करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा नोंद !
ठाणे, १० मे (वार्ता.) – रस्त्यांवरील खड्डे भरण्याच्या कामाच्या देयकासाठी कंत्राटदार आस्थापनाशी संबंधित असणाऱ्या दोघांनी उल्हासनगर महानगरपालिकेच्या मुख्यालयातील लिपीक संदीप बिडलान यांना मारहाण आणि शिवीगाळ केली. या प्रकरणी संबंधित लिपिकाच्या तक्रारीवरून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात ‘जय भारत कन्स्ट्रक्शन’ या आस्थापनाशी संबंधित संजय चांदनानी आणि अजय चांदनानी यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.