मनसेचे संदीप देशपांडे यांच्या जामिनावर १७ मे या दिवशी सुनावणी !
मुंबई – मनसचे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि मनसेचे संतोष धुरी यांच्या जामिनाच्या अर्जावर १७ मे या दिवशी सुनावणी होणार आहे. न्यायाधीश उपस्थित राहू न शकल्यामुळे १० मे या दिवशी मुंबई उच्च न्यायालयात या जामिनावर सुनावणी होऊ शकली नाही.
४ मे या दिवशी राज ठाकरे यांच्या निवासस्थानाच्या बाहेर पोलिसांनी संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना कह्यात घेण्याचा प्रयत्न केला होता; पण त्यांनी पलायन केले. या वेळी एका महिला पोलिसाला धक्काबुक्की होऊन त्या पडल्याचा आरोप पोलिसांनी केला. या प्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्यावरून देशपांडे आणि संतोष धुरी यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. तेव्हापासून ते दोघेही अज्ञातवासात आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पुढील सुनावणी होईपर्यंत त्यांच्या अटकेची शक्यता वर्तवली जात आहे. संदीप देशपांडे यांनी एक व्हिडिओ प्रसारित करून पोलीस या प्रकरणात त्यांना गुंतवत असल्याचा आरोप केला आहे.