जून-जुलैमध्ये कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता ! – आरोग्यमंत्री
मुंबई – कोरोनाची रुग्णसंख्या सध्या वाढत असतांना परिस्थिती मात्र नियंत्रणात आहे; मात्र अशा स्थितीतही चौथी लाट येण्याचा धोका आहे. जून-जुलैमध्ये कोरोनाची चौथी लाट येऊ शकते, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. जालना येथे प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. ‘लसीकरणाचे प्रमाण वाढवणे, हेच राज्यासमोरील आव्हान आहे’, असेही टोपे या वेळी म्हणाले.