इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील जोगेश्वरी-विक्रोळी लिंकरोड जंक्शनचा उड्डाणपूल पुढील १२ दिवस बंद !
मुंबई – इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील जोगेश्वरी-विक्रोळी लिंकरोड जंक्शनचा उड्डाणपूल पुढील १२ दिवस बंद रहाणार आहे. दुरुस्तीच्या कामासाठी १३ ते २४ मेपर्यंत उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद राहील. त्यामुळे सर्व वाहतूक ही खालच्या रस्त्याने वळवली जाईल. या कालावधीत वाहतूक मंदावण्याची शक्यता आहे.