नवी मुंबईतील एम्.जी.एम्. रुग्णालयात ४ वर्षीय मुलाचा मृत्यू !
नवी मुंबई – कळंबोली येथील एम्.जी.एम्. रुग्णालयात ४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. पाठीवर गाठ आली असल्याने त्याला उपचारांसाठी रुग्णालयात भरती केले होते. ८ मे या दिवशी रविवार असल्याने बहुतांश आधुनिक वैद्य उपस्थित नव्हते. तेथील एका तंत्रज्ञाने मुलाला इंजेक्शन दिले. त्यानंतर मुलाचा मृत्यू झाला. पीडित कुटुंब मूळचे नेपाळचे असून पनवेल येथे रहात आहे. या घटनेनंतर तंत्रज्ञ संकेत धुमाळ पसार झाला आहे. मुलाच्या शवविच्छेदन अहवालाच्या नंतरच पुढील कारवाई करण्यात येईल. या प्रकरणी पुढील अन्वेषण चालू आहे.