सनातनच्या ग्रंथांतील ज्ञानाचा विविध माध्यमांतून होणारा व्यापक प्रसार !
सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…
ग्रंथलिखाणाचे अद्वितीय कार्य करणारे एकमेव परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !
डॉ. जयंत आठवले यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) वर्ष १९९५ मध्ये डॉ. आठवले यांना म्हणाले होते, ‘‘आता जगभर धर्मप्रसार करा.’’ डॉ. जयंत आठवले यांच्यासाठी प.पू. बाबांचा हा आशीर्वादच होता. आज परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ग्रंथसंपदेमुळे सर्वत्र हिंदु धर्म आणि अध्यात्म यांचा प्रसार होत आहे. गुरूंच्या आशीर्वादामुळे कार्य होण्यासाठी गुरूंविषयी दृढ श्रद्धा, गुरुचरणी समर्पितभाव, लोककल्याणाची तीव्र तळमळ आणि कार्यातील निःस्वार्थता, हे गुण शिष्यातही असावे लागतात. परात्पर गुरु डॉक्टरांमध्ये हे सारे गुण आहेत; म्हणूनच सनातनचे कार्य आज एवढे वाढले आहे.
परात्पर गुरु डॉक्टरांच्या या व्यापक ग्रंथकार्याच्या संदर्भातील विविध पैलूंची माहिती देणारी ही लेखमालिका त्यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त प्रसिद्ध करत आहोत. या तिसऱ्या लेखात ग्रंथांतील ज्ञान ‘नियतकालिके, संकेतस्थळे, सामाजिक प्रसारमाध्यमे इत्यादी माध्यमांतून भारतभर आणि जगभर कसे पोचत आहे’, याविषयी सांगितले आहे. वाचकहो, ‘आपणही अशा विविध
माध्यमांचा उपयोग करून सनातनचे ग्रंथकार्य वाढवून धर्मकार्यात सहभागी व्हावे’, अशी आपल्याला नम्र विनंती !
लेखांक ३ (भाग १)
संकलक : (पू.) संदीप आळशी (सनातनच्या ग्रंथांचे एक संकलक), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
ग्रंथांतील ज्ञान अंतर्भूत असलेली सनातनची प्रकाशने !प्रस्तुत लेखमालेतील सर्व लेख साधकांनी संग्रही ठेवावेत. ग्रंथ प्रदर्शने, ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ इत्यादी प्रसंगी जिज्ञासूंचे प्रबोधन करण्यासाठी या लेखमालिकेत दिलेल्या माहितीचा उपयोग होईल. – संपादक |
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या असामान्य ‘सामान्यत्वा’चे एक उदाहरण !‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे स्वतः ‘परात्पर गुरु’ पदावरील संत आहेत. ते अनेक संस्था, हिंदुत्वनिष्ठ आणि साधक यांच्यासाठी आध्यात्मिक स्तरावरील मार्गदर्शक आहेत. इतके सर्व असूनही ग्रंथ-निर्मितीच्या अंतर्गत त्यांच्याकडे टंकलिखित करून येणाऱ्या ग्रंथाच्या लिखाणातील शुद्धलेखन आणि व्याकरण पडताळण्याची सेवाही ते स्वतःच करतात.’ – (पू.) संदीप आळशी, सनातनच्या ग्रंथांचे संकलक (क्रमशः) |
१. ग्रंथांतील ज्ञानाला नियतकालिकांद्वारे प्रसिद्धी !
१ अ. नियतकालिक ‘सनातन प्रभात’द्वारे प्रसिद्धी : सनातनच्या ग्रंथांतील लिखाण हिंदुत्वनिष्ठ नियतकालिक ‘सनातन प्रभात’च्या सर्व भाषांतील आवृत्त्यांमध्ये नियमित प्रसिद्ध केले जाते.
१ आ. अन्य नियतकालिकांद्वारे प्रसिद्धी : सनातनच्या ग्रंथांतील लिखाण महाराष्ट्र, बंगाल, बिहार, झारखंड आदी ९ राज्यांतील आणि देहली या केंद्रशासित प्रदेशातील विविध नियतकालिकांतून प्रसिद्ध होते. या नियतकालिकांची संख्या आणि काही नियतकालिकांची नावे पुढे दिली आहेत.
१ आ १. दैनिके : ग्रंथांतील लिखाण २४१ दैनिकांतून प्रसिद्ध होते. यांमध्ये महाराष्ट्रातील ‘सामना’, ‘आपला वार्ताहर’, ‘लोकमान्य सांजवार्ता’, ‘वृत्तमानस’, ‘आफ्टरनून व्हॉइस’, ‘स्प्राऊट्स’; तसेच बंगाल, झारखंड, बिहार अन् ओडिशा या ४ राज्यांतून प्रसिद्ध होणाऱ्या ‘जागरण’ आणि ‘अमर उजाला’ या दैनिकांचा समावेश आहे.
१ आ २. साप्ताहिके : ग्रंथांतील लिखाण ३३ साप्ताहिकांतून प्रसिद्ध होते. यांत ‘मुळशी दिनांक’ (पुणे), ‘बटुक समाचार’ (पुणे) इत्यादींचा समावेश आहे.
१ आ ३. मासिके : महाराष्ट्रातील ‘जनसज्जन’, ‘अपेक्षा’ इत्यादी ११ मासिकांतून सनातनच्या ग्रंथांतील लिखाण प्रसिद्ध होते.
१ आ ४. ‘न्यूज पोर्टल’ : ‘एम्पीसी न्यूज’ इत्यादी ८१ ‘न्यूज पोर्टल’मधून सनातनच्या ग्रंथांतील लिखाण प्रसिद्ध होते.
२. ग्रंथांतील ज्ञानाला प्रसारसाहित्याद्वारे प्रसिद्धी !
अ. गुढीपाडवा, होळी, गणेशोत्सव, दिवाळी आदी सणांच्या निमित्ताने काही धार्मिक आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना; तसेच १५ ऑगस्ट, २६ जानेवारी आदी प्रसंगी काही राष्ट्रप्रेमी अन् धर्मप्रेमी संघटना सनातनच्या ग्रंथांतील लिखाण अंतर्भूत असलेली हस्तपत्रके, ‘फ्लेक्स’ फलक आदी प्रकाशित करतात.
आ. विविध आस्थापने स्वतःची दिनदर्शिका आणि वार्षिक दैनंदिनी (डायरी) यांत, तर अनेक जण मुंज आणि विवाह यांच्या निमंत्रण-पत्रिकांमध्ये सनातनच्या ग्रंथांतील ज्ञान प्रकाशित करतात.
३. ग्रंथांतील ज्ञान अंतर्भूत असलेली सनातनची प्रकाशने !
३ अ. सनातन पंचांग (दिनदर्शिका) : वर्ष २००६ पासून प्रसिद्ध होणाऱ्या वार्षिक ‘सनातन पंचांगा’मध्ये सनातनच्या ग्रंथांतील लिखाण प्रसिद्ध केले जाते. मराठी (३ आवृत्त्या), हिंदी, कन्नड (२ आवृत्त्या), इंग्रजी, तेलुगु, तमिळ आणि ओडिया या ७ भाषांत प्रकाशित होणारे हे पंचांग प्रतिवर्षी साधारणपणे ८ लाख ग्राहकांपर्यंत पोचते. या पंचांगाचे ७ भाषांतील ‘ॲन्ड्रॉइड’साठीचे ‘ॲप्लिकेशन’ही वर्ष २०१३ पासून विनामूल्य प्रकाशित केले जात आहे. त्याद्वारेही प्रतिवर्षी ८ लाखांहून अधिक वाचक सनातनच्या ग्रंथांतील ज्ञानाचा लाभ घेत आहेत.
३ आ. संस्कार वही : वर्ष २००६ पासून प्रसिद्ध होणाऱ्या संस्कार वहीमध्ये मुलांवर सुसंस्कार करणारे, तसेच धर्मशिक्षण देणारे आणि राष्ट्रप्रेम वाढवणारे लिखाण असते. यांतील बहुतांशी लिखाण सनातनच्या ग्रंथांतून घेतलेले असते.
४. ग्रंथांतील ज्ञानाला दूरचित्रवाहिन्यांद्वारे भारतभर आणि जगभर प्रसिद्धी !
४ अ. उपग्रह दूरचित्रवाहिन्यांद्वारे प्रसिद्धी
१. ग्रंथांतील ज्ञानाच्या आधारे ‘सनातन संस्था चेन्नई’ने ‘ईश्वरप्राप्तीके लिए अध्यात्मशास्त्र’ या नावाने धर्मसत्संगांचे १६४ भाग बनवले आहेत, तर ‘हिंदु जनजागृती समिती’ने ‘धार्मिक कृत्योंका शास्त्र’ या नावाने धर्मसत्संगांचे २०६ भाग बनवले आहेत. या धर्मसत्संगांचे प्रसारण ‘श्री शंकरा’ या दूरचित्रवाहिनीवरून वर्ष २००८-२००९ मध्ये आशिया खंडात करण्यात आले.
२. ‘धार्मिक कृत्योंका शास्त्र’ या मालिकेचे विविध भाग ‘सुदर्शन’ या दूरचित्रवाहिनीवरून वर्ष २०१० मध्ये विविध देशांत प्रसारित करण्यात आले.
४ आ. स्थानिक केबलचालकांद्वारे आंतरराज्य प्रसिद्धी : वर्ष २०११-१२ मध्ये भारतातील विविध राज्यांत स्थानिक केबलचालकांद्वारे वर उल्लेख केलेल्या धर्मसत्संगांचे प्रसारण करण्यात आले. या धर्मसत्संगांचा लाभ मध्यप्रदेश, राजस्थान, देहली, हरियाणा, बिहार, झारखंड, महाराष्ट्र आणि ओडिशा या राज्यांतील २०,३९,००० हून अधिक दर्शकांनी घेतला. आजही महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यांतील काही नगरांमध्ये (शहरांमध्ये) या धर्मसत्संगांचे प्रसारण केले जाते.
(क्रमश:)
भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा. https://sanatanprabhat.org/marathi/578985.html |