परभणी येथे निकृष्ट दर्जाचे बांधलेले उड्डाणपुलाचे खांब पाडले !
निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरणाऱ्या कंत्राटदाराला रेल्वे अधिकाऱ्यांचा हिसका !
परभणी – येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापिठात ये-जा करण्यासाठी रेल्वे फाटक ओलांडावे लागते. रेल्वे येण्या-जाण्याच्या वेळेत तेथील फाटकावर नागरिकांना थांबावे लागते. त्यामुळे विद्यापिठात जाण्या-येण्यासाठी उड्डाणपूल बांधावा, अशी मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. ती मागणी २ वर्षांपूर्वी मान्य झाली अन् प्रत्यक्ष कामालाही प्रारंभ झाला. गेल्या २ वर्षांत येथे भव्य मोठे खांब (पिलर) उभारण्यात आले; परंतु त्यासाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापण्यात आल्याने रेल्वे अधिकाऱ्यांनी पाडण्याचे आदेश कंत्राटदाराला दिले. त्यामुळे ९ मे या दिवशीपासून जेसीबीच्या साहाय्याने खांब पाडण्यात येत आहेत. २ वर्षांपासून या उड्डाणपुलाचे काम चालू असल्याने हा मार्ग बंद करण्यात आला आहे. बांधलेले खांब तोडण्यात येत असल्याने आता पुन्हा नव्याने हे खांब कधी बांधणार ?, उड्डाणपूल चालू केव्हा होणार ?, असे प्रश्न परभणीकरांना पडले आहेत.
संपादकीय भूमिकाकंत्राटदाराकडून निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याप्रकरणी त्याचे पैसेही वसूल करून घ्यायला हवेत ! |