ज्ञानवापी मशीद उद्ध्वस्त करून तेथे भगवान शिवाच्या पूर्ण परिवाराचे मंदिर बांधले जाईल ! – भाजपचे माजी आमदार संगीत सोम
मेरठ (उत्तरप्रदेश) – काही वर्षे श्री रामलला तंबूत राहिले आता त्यांचे भव्य मंदिर बांधले जात आहे, तसेच काशीमध्ये भगवान श्री काशी विश्वनाथाचे मंदिर बनवण्यात येईल. ज्ञानवापी मशीद उद्ध्वस्त करून तेथे भगवान शिवाच्या पूर्ण परिवाराचे मंदिर बांधले जाईल, असे विधान भाजपचे माजी आमदार संगीत सोम यांनी येथील ज्वलागड स्थित महाराणा प्रताप चौकात आयोजित एका कार्यक्रमात केले. याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे.
संगीत सोम पुढे म्हणाले की, मुसलमान आक्रमकांनी मंदिरे पाडून मशिदी उभ्या केल्या आहेत, त्या परत घेण्याची वेळ आता आली आहे.