सूक्ष्मजगताच्या संदर्भातील प्रदर्शन अत्यंत एकाग्रतेने पाहून जिज्ञासेने प्रश्न विचारणारे पू. भार्गवराम भरत प्रभु !
१. सूक्ष्मजगताच्या संदर्भातील प्रदर्शन पहातांना प्रत्येक चित्राची माहिती ऐकून अत्यंत गांभीर्याने त्यावर प्रश्न विचारणारे पू. भार्गवराम !
‘आम्ही काही दिवसांसाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेलो होतो. मी जिथे सेवेसाठी बसते, तिथे पू. भार्गवराम मला शोधत आले. तिथे मागच्या बाजूला सूक्ष्मजगताच्या संदर्भातील प्रदर्शन लावण्यात आले होते. ते अत्यंत एकाग्रतेने प्रदर्शन पाहू लागले. नंतर त्यांनी मला बोलावून प्रत्येक चित्राची माहिती जाणून घेतली. त्यात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चपलांच्या खालच्या बाजूचे तुकडे, तसेच त्यांच्या वस्त्रांवर पडलेले डाग यांविषयी ते अत्यंत गांभीर्याने प्रश्न विचारत होते. ‘वाईट शक्ती त्यांच्यावर आक्रमण का करतात ? वाईट शक्तींना आक्रमण केल्याने काय मिळते ?’ या प्रश्नांचे उत्तर देतांना मी त्यांना सांगितले, ‘‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे सतत प्रयत्न करून वाईट शक्तींना पळवून लावतात. त्यामुळे रागाने वाईट शक्ती त्यांच्यावर आक्रमण करतात.’’
२. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे महाशक्तीशाली असून सर्व वाईट शक्तींचा नाश करून ते आपले रक्षण करतील’, असे पू. भार्गवराम यांनी सांगणे
त्यानंतर पू. भार्गवराम म्हणाले, ‘‘परात्पर गुरु डॉ. आठवले (प.पू. गुरुदेव) महाशक्तीशाली आहेत. सर्व वाईट शक्तींचा नाश करून ते आपले रक्षण करतील.’’ ‘त्यांच्या बंडीवर आक्रमण का केले आहे ?’, असे विचारल्यावर मी म्हणाले, ‘‘प.पू. गुरुदेवांनी ते परिधान केल्यावर त्यांना त्रास देण्यासाठी तसे करतात.’’ आणखी एक गुलाबी रंगाचा झब्बा दाखवून म्हणाले, ‘‘ते बघ, त्यांच्यावर श्रीकृष्णाचा हात आहे.’’
३. नंतर तिथे एक साधिका आली. पू. भार्गवराम यांनी तिलाही असेच प्रश्न विचारून सर्व प्रदर्शन त्यांच्यासह पुन्हा पाहिले. तिनेही त्यांना सर्व माहिती सविस्तर सांगितली.
४. अहं अल्प असणे
प्रदर्शनात पू. भार्गवराम यांचे बाल्यावस्थेतील एक छायाचित्रही होते. साधिकेने ‘हे कोण आहेत ?’, असे विचारताच त्यांनी त्याविषयी थोडीसुद्धा आसक्ती दाखवली नाही. त्याकडे न बघताच ‘मी’ असे उत्तर देऊन ते पुन्हा प्रदर्शन बघण्यात मग्न झाले.’
– श्रीमती अश्विनी प्रभु (आजी, वडिलांची आई) (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.४.२०२२)
|