हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा राज्य संघटक श्री. मनोज खाडये यांचा गुजरात संपर्क दौरा
उद्योजक, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांचा धर्मकार्यात सहभागी होण्याचा निर्धार
कर्णावती (गुजरात) – हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा राज्य संघटक श्री. मनोज खाडये यांचा गुजरातमध्ये संपर्क दौरा आयोजित करण्यात आला होता. या वेळी श्री. खाडये यांनी उद्योजक, संपादक, शिक्षण क्षेत्रातील प्रतिष्ठित, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ आदींच्या भेटी घेतल्या.
१. प्रतिष्ठित उद्योजक आणि हिंदुत्वनिष्ठ श्री. मेहुल वडावीया यांची श्री. खाडये यांनी सदिच्छा भेट घेतली. या वेळी श्री. वडावीया म्हणाले, ‘‘मी स्वतः तुम्ही सांगितल्याप्रमाणे साधना करून अनुभूती घेतली आहे. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या सेवेसाठी कर्णावती येथे केव्हाही चालक अन् वाहन विनामूल्य उपलब्ध करून देईन.’’
२. उद्योजक श्री. प्रवीण हिंजोडा यांची श्री. खाडये यांनी भेट घेतली. त्या वेळी ‘व्यवसाय करत असतांनाही आपल्याला साधनारत रहात येते’, हे ऐकून श्री. हिंजोडा यांना अतिशय आनंद झाला. त्यांनी आश्रमदर्शनाची इच्छा व्यक्त केली.
३. १६४ वृत्तपत्रांच्या समूहाचे अध्यक्ष आणि प्रथितयश संपादक श्री. प्रदीप रावल अन् ‘जनवार्ता’ वृत्तपत्राचे संपादक श्री. दीपक पांडे यांनी ‘हलाल प्रमाणपत्रा’विषयी करण्यात येत असलेल्या जागृती कार्याची प्रशंसा केली. तसेच त्यांनी ‘यासंबंधीचे सर्व लेख त्यांच्या वृत्तपत्रामधून प्रकाशित करू’, असे सांगितले.
४. ‘विद्याभारती शैक्षणिक संस्थे’चे विश्वस्त आणि कार्यकारी अधिकारी हिंदु जनजागृती समितीचे शिक्षण क्षेत्रातील यश पाहून प्रभावित झाले. ‘तुमच्याप्रमाणे आम्हीही प्रयत्न करू’, असे त्यांनी सांगितले आणि सर्व शिक्षकांसाठी साधना वर्ग चालू करण्याची विनंती केली.
५. ‘रवि इंजिनियर्स’चे संचालक, उद्योजक आणि निसर्गोपचार तज्ञ श्री. राजेश दोशी यांनी समितीचे कार्य जाणून घेतले. धर्मकार्यातील योगदान म्हणून त्यांनी विनामूल्य उपचारपद्धती शिकवण्याची सिद्धता दर्शवली.
६. सूरत येथील ‘मिशन परित्रणाय’ या संस्थेचे युवा विद्यार्थी, पालक, समिती संकेतस्थळाचे वाचक, धर्मप्रेमी, प्रोफाईल सदस्य आणि यांना श्री. खाडये यांनी ‘लव्ह जिहाद’ची विदारकता स्पष्ट केली. तसेच त्यांना साधनेचे महत्त्व विशद केले.
७. सूरत, उमरगाव आणि वापी येथील धर्मप्रेमी अन् हिंदुत्वनिष्ठ यांच्यासाठी आयोजित बैठकीत ‘हलाल प्रमाणपत्रा’विषयी जागृती करण्यात आली. या वेळी सर्वांनी उत्स्फूर्तपणे ‘आम्ही प्रशासनाला निवेदन देऊ, आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग घेऊ आणि सामाजिक माध्यमांतून जागृती करू’, असे सांगितले. या वेळी धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याचे नियोजन झाले.
वैशिष्ट्यपूर्ण
सूरतचे धर्मप्रेमी श्री. कल्पेश मकवाणा यांनी उत्स्फूर्तपणे गायत्री मंदिरात एका बैठकीचे नियोजन केले.