देशातील सर्व समस्यांच्या उपायांसाठी हिंदु राष्ट्र आवश्यक ! – प्रशांत वैती, हिंदु जनजागृती समिती
अमरगंज (उत्तरप्रदेश) येथे ‘हिंदु जागृती बैठकी’ला हिंदुत्वनिष्ठांचा चांगला प्रतिसाद !
अयोध्या (उत्तरप्रदेश) – भारताला हिंदु राष्ट्र घोषित केल्यानंतरच देशातील सर्व समस्यांचे निराकरण होऊ शकते. यासाठी सर्व हिंदूंनी धर्माचरण आणि साधना केली पाहिजे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे अयोध्या समन्वयक श्री. प्रशांत वैती यांनी केले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मिल्कीपूर तालुक्यातील अमरगंज येथील विद्यालयामध्ये ‘हिंदु जागृती बैठक’ घेण्यात आली. या बैठकीला अनेक हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. ही बैठक यशस्वी होण्यासाठी अधिवक्ता पवनकुमार शुक्ला आणि अधिवक्ता अमरजीत सिंह यांनी विशेष प्रयत्न केले.
क्षणचित्रे
१. या बैठकीला सर्व हिंदुत्वनिष्ठ वेळेच्या अर्धा घंटा आधी उपस्थित होते.
२. बैठकीच्या वेळी वीज गेली होती. गरमीचे दिवस असतांनाही सर्व जण लक्ष देऊन विषय ऐकत होते.
३. या वेळी उपस्थितांनी प्रथमच ‘हलाल’ अर्थव्यवस्थेविषयी माहिती ऐकली. याविषयी सर्वांनी संपूर्ण तालुक्यात जागृती करण्याचा निश्चय केला.