भरतपूर (राजस्थान) येथे धर्मांधांच्या जमावाकडून हिंदूंवर आक्रमण
भरतपूर (राजस्थान) – येथील ‘बुद्ध की हाट’ या भागामध्ये ९ मेच्या रात्री धर्मांधांच्या जमावाने हिंदूंवर आक्रमण केले. या वेळी हिंदूंकडूनही त्याला प्रत्युत्तर देण्यात आले. दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर दगड आणि काचेच्या बाटल्या फेकण्यात आल्या. या वेळी एक नागरिक घायाळ झाला.
वर्ष २०१३ मध्येही दोन्ही समुदायांमध्ये संघर्ष झाला होता. त्यावेळी अटकेत असलेल्या आरोपींना न्यायालयाने नुकतेच निर्दोष घोषित केले. ९ मे या दिवशी ते घरी परतले असता येथे आनंद साजरा करण्यात आला. त्या वेळी ढोल आणि डीजे (मोठी संगीत यंत्रणा) वाजवण्यात आले. त्यामुळे दुसर्या पक्षाने त्यांच्यावर काचेच्या बाटल्या फेकण्यास चालू केले. त्याला पहिल्या पक्षानेही दगडफेक करत प्रत्युत्तर दिले. या वेळी एका धार्मिक स्थळावरही दगडफेक करण्यात आली. तसेच २ दुचाकींची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी ३१ जणांना अटक केली आहे. येथे सध्या मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
संपादकीय भूमिका
|