मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीचेही सर्वेक्षण आणि चित्रीकरण करण्याची न्यायालयाकडे मागणी
मथुरा (उत्तरप्रदेश) – काशीच्या ज्ञानवापी मशिदीप्रमाणेच मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीवरील शाही ईदगाह मशिदीचेही सर्वेक्षण आणि चित्रीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी न्यायालयाला प्रार्थनापत्र सादर करण्यात आले आहे. या वेळी ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाच्या संदर्भातील सर्व कागदपत्रेही सादर करण्यात आली आहेत. अधिवक्ता महेंद्र प्रताप यांनी हे प्रार्थनापत्र सादर केले आहे.