ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण आणि चित्रीकरण यांवर आज निर्णय

वाराणसी (उत्तरप्रदेश) – येथील दिवाणी न्यायालयात शृंगारगौरी मंदिर आणि ज्ञानवापी मशीद यांचे सर्वेक्षण अन् चित्रीकरण यांच्या संदर्भात झालेली सुनावणी अपूर्ण राहिल्याने यावर उद्या, ११ मे या दिवशी पुढील सुनावणी होणार आहे. १० मे या दिवशी झालेल्या सुनावणीच्या वेळी मुसलमान पक्ष आणि हिंदु पक्ष यांच्याकडून युक्तीवाद करण्यात आला. या वेळी न्यायालय आयुक्तांनी आतापर्यंत केलेल्या सर्वेक्षणाचा आणि चित्रीकरणाचा अहवाल सादर केला. यात सर्वेक्षणाला झालेल्या विरोधाचीही माहिती देण्यात आली आहे. मुसलमान पक्षाने या वेळी न्यायालय आयुक्तांना पालटण्याची मागणी केली. ती फेटाळण्यात आली.

हिंदूंच्या पक्षाकडून मशिदीतील तळघराचे सर्वेक्षण करण्यासाठी तेथील टाळे तोडण्याची मागणी करण्यात आली. तसेच सर्वेक्षणासाठी योग्य संरक्षण देण्याचीही मागणी केली. यावर न्यायाधिशांनी स्पष्ट केले की, आवश्यकता भासल्यास आम्हीही तुमच्यासमवेत सर्वेक्षणासाठी येऊ.