महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलीस आयुक्त यांच्या विरोधात राणा दांपत्याची लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार !
मुंबई – खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी ९ मे या दिवशी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन महाराष्ट्र सरकार आणि मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याविरोधात तक्रार केली. हनुमान चालिसा प्रकरणात अटक करतांना सूडबुद्धीने कारवाई करण्यात आल्याचा आरोप राणा दांपत्याने केला आहे.
याविषयी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना खासदार नवनीत राणा म्हणाल्या की, आमच्यावर झालेल्या अन्यायाची लोकसभेच्या अध्यक्षांना सविस्तर माहिती आम्ही दिली. आमचे म्हणणे त्यांनी ऐकून घेतले. २३ मे या दिवशी आमचे म्हणणे प्रत्यक्षरित्या आणि लेखी स्वरूपात समजून घेतले जाणार आहे.