मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गॅस टँकर उलटून ३ जणांचा मृत्यू !
मुंबई – मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ‘प्रोपोलिन गॅस’चा टँकर उलटून झालेल्या भीषण अपघातामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला. खोपोली येथील उतारावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला. ९ मे या दिवशी दुपारी १२ वाजता हा अपघात घडला.
अपघातामध्ये टँकरचा चालक गंभीर घायाळ झाला आहे. टँकर उलटल्यावर मागून वेगात येणाऱ्या ३ गाड्या टँकरवर आदळल्या. अपघात झालेला टँकर पुणे येथून मुंबईला जात होता. अपघातामुळे दोन्ही बाजूंनी होणारी वाहतूक काही काळ थांबवण्यात आली. अपघातस्थळी बोरघाट येथील पोलीस यंत्रणा, पेट्रोलिंग करणारे पोलीस, देवदूत यंत्रणा, लोकमान्य हॉस्पिटल, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल हे तातडीने पोचले. सुदैवाने टँकरमधील वायूची गळती झाली नाही.