(म्हणे) ‘श्री विठ्ठलाच्या चरणस्पर्श दर्शनाविषयी पुनर्विचार करा !’
पुरातत्व विभागाच्या मंदिर समितीला सूचना
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – श्री विठ्ठलाची मूर्ती सुरक्षित आहे, तर रुक्मिणीमातेच्या चरणांची झीज झाली असल्याने पुन्हा वज्रलेप करावा. चरणस्पर्श दर्शनामुळे मूर्तींच्या चरणांची झीज मोठ्या प्रमाणात होत असल्याने चरणस्पर्श दर्शनाविषयी पुनर्विचार करा, अशा सूचना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला पुरातत्व विभागाचे संचालक श्रीकांत मिश्रा यांनी दिल्या. ८ मेच्या पहाटे पुरातत्व विभागाच्या ४ अधिकाऱ्यांनी सोवळे परिधान करून श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेच्या मूर्तींची पहाणी केली.
गाभाऱ्यातील प्रखर उष्णता निर्माण करणारे विजेचे दिवे पालटावेत, गाभाऱ्यातील ‘ग्रॅनाईटच्या फरशा’ पालटून मंदिराचा मूळ दगडी गाभारा ठेवावा, तसेच भाविकांकडून चरणस्पर्श दर्शन घेतले जात असल्याने चरणांची झीज होत आहे. याविषयी विचार व्हावा, अशा सूचना पुरातत्व विभागाने मंदिर समितीला केल्या आहेत. मागील २ वर्षांपूर्वीच श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या मूर्तींच्या चरणांवर ‘सिलिकॉन’चे लेप देण्यात आले होते; मात्र हा वज्रलेप अल्प कालावधीतच निघण्यास प्रारंभ झाला आहे.
संपादकीय भूमिकायाविषयी धर्मशास्त्रातील जाणकारांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे ! |