नवघर येथे तक्रारदार महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलीस हवालदारास अटक !
ठाणे, ९ मे (वार्ता.) – नवघर पोलीस ठाण्यात पतीच्या विरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार प्रविष्ट करण्यासाठी गेलेल्या महिलेला साहाय्याच्या बहाण्याने अन्यत्र नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी पोलीस हवालदार बाबासाहेब ढोले यांना अटक करण्यात आली आहे. (हा तर कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार ! – संपादक)
२७ वर्षीय महिलेला आरोपीने साहाय्याचे आश्वासन देऊन उत्तन येथील धारावी मंदिरात नेले आणि तेथे तिच्यावर अत्याचार केला. यानंतर तिला ‘घरच्यांशी ओळख करून देतो’, असे सांगून रहात्या घरी नेले आणि तेथेही बळजोरी केली, असा आरोप महिलेने केला आहे. याप्रकरणी पुढील अन्वेषण पोलीस करत आहेत.