इस्लामवर श्रद्धा नसणाऱ्यांना अजान ऐकणे बंधनकारक का ?
१. अजानमधील वाक्य राज्यघटनेला अपमानित करणारे आणि धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन करणारे असणे !
सध्या इस्लामिक प्रथांनी विक्राळ रूप धारण केले आहे. बहुतांश धार्मिक गोष्टी या त्याच धर्माच्या लोकांना विशेष रूपाने समजणाऱ्या असतात. अशा वेळी मुसलमानांकडून येथील बहुसंख्यांक हिंदु समाजाला ध्वनीक्षेपकांमधून बळजोरीने मोठ्या आवाजात अजान ऐकवण्यामागे काय कारण ? ‘अल्ला सर्वांहून मोठा आहे, मी साक्ष देतो की, महंमद हे अल्लाचे रसूल आहेत. नमाजासाठी या, धर्माच्या यशासाठी या, नमाज झोपण्याहून चांगला आहे आणि अल्लाच्या एकमात्र आराधनेसाठी योग्य आहे’, हे अजानमध्ये सांगण्यात येते. अशा प्रकारे नमाजाची भाषा आणि शब्द धर्मनिरपेक्ष भारताच्या राज्यघटनेला अपमानित करतात, तसेच त्यातील भेदभाव करणारे वाक्य हे राज्यघटनेने दिलेली समानता आणि धार्मिक स्वातंत्र्य यांच्या मौलिक अधिकारांचे उल्लंघन करतात, जे राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक आहेत.
२. राज्यघटनेनुसार नागरिकांना अभिव्यक्तीस्वातंत्र्य असल्याने कुणालाही मोठ्या आवाजात ध्वनीक्षेपक वाजवण्याची अनुमती नसणे
६० डेसिबलहून अधिक आवाज ऐकल्यास मनुष्य बहिरा होऊ शकतो. फटाके उडवल्याने अनुमाने ११० डेसिबलचा आवाज होतो. ‘ध्वनीप्रदूषण नियंत्रण आणि नियमन २०००’ या कायद्यानुसार मानवी वस्तीच्या क्षेत्रासाठी दिवसा ५० डेसिबल आणि रात्री ४० डेसिबल इतक्या आवाजात ध्वनीक्षेपक लावता येऊ शकतात. या कायद्यानुसार रात्री १० वाजल्यापासून सकाळी ६ वाजेपर्यंत अनुमती न घेता मोठ्या आवाजात कार्यक्रम करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मोठ्या वाहनांच्या ‘हॉर्न’साठी कमाल १२५ डेसिबल आणि दुचाकी वाहनांसाठी १०५ डेसिबलची मर्यादा निर्धारित करण्यात आली आहे.
भारतीय राज्यघटना ही अनुच्छेद १९ (१) अ आणि अनुच्छेद २१ नुसार प्रत्येक नागरिकाला उत्तम वातावरण अन् शांतीपूर्ण जीवन जगण्याचा अधिकार देते. ‘पीए जैकब विरुद्ध कोट्टायम पोलीस अधीक्षक’ या प्रकरणामध्ये केरळ उच्च न्यायालयाने स्पष्ट केले, ‘घटनेमध्ये १९ (१) अ नुसार देण्यात आलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य हे कुणालाही मोठ्या आवाजात ध्वनीक्षेपक आणि गोंधळ करणारे उपकरण वाजवण्याची अनुमती देत नाही.’ मोठ्या आवाजाशी संबंधित समस्या केवळ एक राज्य किंवा क्षेत्र यांच्यापुरती मर्यादित नसून ती संपूर्ण देशात आहे. जम्मू काश्मीरचे मंगू राम विरुद्ध भारत सरकार, देहलीच्या उच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती ठाकूर आणि टी.एस्. सिद्धार्थ मृदुल यांच्या खंडपिठामध्ये ‘देहली मेट्रो रेल्वे कॉर्पाेरेशन’च्या विरोधात नोंदवलेले प्रकरण, मद्रास उच्च न्यायालयातील ‘मोहाना विरुद्ध पोलीस आयुक्त’ आणि अन्य प्रकरणे, गुजरात उच्च न्यायालयामध्ये प्रविष्ट झालेले ‘बुर्राबाजार फायर वर्क्स डिलर’चे प्रकरण या खटल्यांवरून ही समस्या संपूर्ण भारतात असल्याचे दिसून येते.
३. बहुसंख्य असलेल्या हिंदु समाजाने वर्षानुवर्षे शिक्षा भोगत रहाणे अयोग्य !
मोठ्या आणि भेसूर आवाजामुळे व्यक्तीच्या आरोग्याची मोठ्या प्रमाणात हानी होते. जो आवाज किंवा संगीत ऐकल्याने आपल्याला अस्वस्थ वाटणार नाही, तो कर्णप्रिय ध्वनी किंवा संगीत यांच्या श्रेणीमध्ये येतो. याउलट एखाद्या आवाजाने तुमच्या कानाला किंवा डोक्याला त्रास होत असेल, तर त्याला अयोग्य समजण्यात येतो. संपूर्ण देशात मोठ्या आवाजात होणारी अजान नागरिकांच्या झोपेत आणि शांततेमध्ये मोठा अडथळा निर्माण करते, तसेच त्यांना अनेक गंभीर मानसिक आजारही भेट देते. याचसह ती आवडीच्या आणि नावडीच्या लोकांना बळजोरीने ऐकवणे, ही गोष्ट याहून अधिक धोकादायक आहे. जेव्हा १९ जानेवारी १९९० या दिवशी मशिदींमधील ध्वनीक्षेपक काश्मिरी हिंदूंसाठी प्राणघातक बनतात; लक्षावधी कुटुंबांचे पलायन, बलात्कार, हत्या, हिंसाचार, लूटमार आणि आग लावणे यांना कारणीभूत बनतात, तेव्हा या ध्वनीक्षेपकांच्या वापराची मानसिकता संशयास्पद बनते. ही गोष्ट संपूर्ण देशामध्ये लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. बहुसंख्य असलेल्या हिंदु समाजाने वर्षानुवर्षे भोंग्यामधून येणाऱ्या मोठ्या आवाजाची शिक्षा भोगत रहाणे योग्य नाही. त्यामुळे बहुसंख्य हिंदु समाज सुख आणि शांतीने राहू शकेल, यासाठी या जिहाद्यांना योग्य प्रकारे जगणे आणि आचरण करण्याची पद्धत शिकवणे, हे देशाच्या कायदा अन् सुव्यवस्थेचे दायित्व आहे.
– श्री. विजय शंकर तिवारी
(साभार – मासिक ‘हिंदु विश्व’, १६ ते ३० एप्रिल २०२२)