आपत्काळात देवतेची कृपा कशी संपादन करावी ?
‘साधकांनो, आज आणि आतापासून ईश्वर आपल्यावर प्रसन्न रहावा अन् आपत्काळात त्याचे संरक्षककवच आपल्याला मिळावे’, यासाठी प्रयत्न करावा. सर्वप्रथम आपल्याला पुढील चार वर्षे नित्य दोन वेळचा प्रसाद मिळावा (भोजन मिळावे) आणि ईश्वराची कृपा टिकून रहावी, यासाठी काही सूत्र सांगते.
(भाग १)
१. निधर्मी लोकशाहीचे दुष्परिणाम !
२० वर्षांपूर्वी हिंदु स्त्रिया स्वयंपाकघरात धर्मपालन करत होत्या; पण आजच्या स्त्रिया ते करत नाहीत. यामागील दोन कारणे मला विशेषरूपाने लक्षात आली. एकतर त्या मातांनी आपल्या कन्यांवर याविषयीचे संस्कार केलेले नाहीत किंवा दुसरे कारण म्हणजे आळसामुळे त्या स्त्रिया तसे करत नाहीत. आता तर आपत्काळाला आरंभ झाला आहे. निधर्मी लोकशाहीमुळे आपण अधिक अपेक्षा ठेवू शकत नाही, हे आपण या कोरोनाकाळात अनुभवले आहे. खरे पहाता जर आमचे शासनकर्ते धर्मनिष्ठ असते आणि त्यांनी संतांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे शासन चालवले असते, तर आज अशी स्थिती झाली नसती; कारण अशी कोणतीही समस्या नाही की, जी सोडवण्यासाठी उपाययोजना निघू शकत नाही. आता तर पाणी डोक्यावरून चालले आहे. अनेक संत पुनःपुन्हा सांगत आहेत, ‘‘येणारा काळ अत्यंत भीषण असणार आहे. त्यासाठी आताच साधना करा आणि करवून घ्या.’’ जर शासनकर्त्यांनी असे केले असते, तर आज स्थिती वेगळीच झाली असती; परंतु निधर्मी लोकशाहीतील शासनकर्त्यांना आध्यात्मिक दृष्टीकोनच नाहीत !
२. सामान्य घरातील बहुतांश स्त्रिया रज-तमात्मक आचरण करत असल्याने त्यांनी बनवलेले भोजन अपवित्र असणे
अनेक धर्मनिष्ठ ब्राह्मण, साधक, संन्यासी आणि संत हे सामान्य गृहस्थाच्या घरी जेवू इच्छित नाहीत; कारण त्यांच्या घरातील बहुतांश स्त्रिया स्वतःच्या रज-तमात्मक आचरणाने स्वयंपाकघर अशुद्ध करतात. त्यामुळे त्यांनी बनवलेले भोजन हे अपवित्र असते.
३. अन्नपूर्णाकक्षात ब्रह्मांडाचे पोषण करणारी माता अन्नपूर्णा विराजमान असल्याने तेथे कसलीच न्यूनता न भासणे
आपण आपल्या स्वयंपाकघराला ‘अन्नपूर्णा कक्ष’ करायला हवा. स्वयंपाकघरात अन्नाची कमतरता पडू शकते. अन्नपूर्णा कक्षात संपूर्ण ब्रह्मांडाचे पोषण करणारी माता अन्नपूर्णा विराजमान असते. त्यामुळे तेथे कधीही न्यूनता भासू शकत नाही. कोरोना काळात घरातील अलगीकरणामध्ये असतांना मी याची प्रत्यक्ष प्रचीती घेतली आहे.
४. अन्नपूर्णादेवीच्या कृपेमुळे कोरोना काळात कोणतीही उणीव न भासल्याने ‘देवीनेच सर्व वस्तू पुरवल्या’, असे वाटणे
इंदूर शहर कोरोनाच्या संसर्गाने अत्याधिक प्रभावित झाले होते; परंतु आम्हाला आश्रमात (शहरापासून ४७ कि.मी. अंतरावर असणाऱ्या) सर्व काही साहित्य शहरातूनच यायचे. घरातील अलगीकरणामुळे वाहनांची ये-जा दीड मास ठप्प झाली होती; पण आम्हाला कोणत्याही वस्तूची उणीव भासली नाही. आम्हाला सर्व काही सहजतेने आणि योग्य दरात मिळत होते. ‘कोरोनाचा कसलाही प्रभावच नाही’, असे वाटत होते. काही वस्तू तर आम्हाला अशा मिळत होत्या की, जणू काही ‘अन्नपूर्णामातेनेच त्या पुरवल्या कि काय ?’, असे वाटत होते. मी एप्रिल २०१३ पासूनच आश्रमातील पूर्णवेळ साधिका आणि गृहस्थाश्रमी स्त्रिया यांच्याकडून धर्मपालन करण्याचा प्रयत्न करवून घेत आहे. त्यामुळे त्या अनुभवाच्या आधारे या लेखमालेद्वारे एकेक सूत्र येथे दिले आहे.
५. सकाळी अन्नपूर्णा कक्षात जाण्याविषयीचे काही नियम !
अ. सकाळी उठल्यावर अंघोळ न करता अन्नपूर्णा कक्षात जाऊ नये. हे सूत्र घरातील सर्व सदस्यांनाही लागू पडते. यामुळे तुमच्यामध्ये सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करण्याची वृत्ती निर्माण होईल, तसेच ‘अन्नपूर्णाकक्ष, म्हणजे साक्षात् अन्नपूर्णामातेचे मंदिर आहे’, हा भाव निर्माण होईल.
आ. जर पाणी गरम करायचे असेल, तर विनाशौच करता ते गरम करावे. चहासुद्धा स्नान करूनच प्यावा.
थोडक्यात काय, तर पाणी गरम करण्याव्यतिरिक्त कोणताही आहार अन्नपूर्णामातेची पूजा न करता बनवू नये. आपत्काळातसुद्धा आपल्या घरी चूल चालू ठेवावी. अग्निदेव आणि अन्नपूर्णामाता यांची कृपा होण्यासाठी या आचरणाचा अंगीकार करावा !
– पू. तनुजा ठाकूर, संस्थापिका, वैदिक उपासना पीठ (२९.१.२०२२)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा. https://sanatanprabhat.org/marathi/578674.html |