परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७९ व्या जन्मोत्सवाच्या दिवशी साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
२.५.२०२१ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ७९ वा जन्मोत्सवानिमित्तचा ‘ऑनलाईन’ कार्यक्रम दाखवण्यात येणार असल्याचे मला समजले. त्या वेळी साक्षात् प.पू. गुरुमाऊलीचे दर्शन घेण्याची संधी मिळणार असल्याने मला आनंद होत होता.
१. परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्राला घालण्यासाठी फुलांचा हार बनवण्याची सेवा करतांना आलेल्या अनुभूती
अ. सोहळ्याच्या दिवशी मला परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्राला घालण्यासाठी फुलांचा हार बनवण्याची सेवा मिळाली. ती सेवा करतांना ‘मी प्रभु श्रीरामरायासाठीच हार बनवत आहे’, असा विचार मनात येऊन माझा भाव जागृत झाला.
आ. हार बनवतांना ‘मी रामराज्यात असून आज श्रीरामराज्याभिषेक सोहळा आहे’, असे मला वाटत होते. मी त्रेतायुगातील वातावरण अनुभवत होते. ‘प्रभु श्रीरामराया भेटणार’, याची उत्कंठा माझ्या मनाला लागली होती.
इ. हार बनवतांना माझ्याकडून श्रीरामरायाची आरती आणि भजने आपोआप म्हटली गेली.
२. सोहळा ‘ऑनलाईन’ पहातांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
अ. सोहळ्याला आरंभ होताच परात्पर गुरु डॉक्टरांना प्रभु श्रीरामरायाच्या रूपात पाहून मी फुलांचा हार करत असतांना मला आलेल्या अनुभूतीचा उलगडा झाला.
आ. सोहळा पहात असतांना माझा कृतज्ञताभाव जागृत होऊन माझ्या डोळ्यांतून भावाश्रू वाहू लागले.
‘हे श्रीकृष्णा, ‘तुझ्या कृपेने या जिवाला प्रत्यक्ष प्रभु श्रीरामरायाला अनुभवण्याची आणि त्याला पहाण्याची संधी मिळाली’, याबद्दल तुझ्या चरणी संपूर्ण शरणागतभावाने कोटीशः कृतज्ञता !
– सौ. जया नितीन साळोखे (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१५.५.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |