औंध (सातारा) पोलीस ठाण्याचे कारागृह तोडून दरोडेखोर पळाले !
सातारा, ९ मे (वार्ता.) – जिल्ह्यातील औंध पोलीस ठाण्याचे कारागृह तोडून ९ मे या दिवशी पहाटे ३ वाजता दरोडेखोर पळून गेले. पळून जातांना दरोडेखोरांनी पोलीस ठाण्यातील पोलिसांना मारहाण केली. (कारागृहातील दरोडेखोरांकडून मार खाणारे पोलीस काय कामाचे ? – संपादक) पोलिसांनी दरोडेखोरांचे अन्वेषण चालू केले आहे.
संशयित दरोडेखोरांना एका गंभीर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली होती. पोलीस कोठडी मिळाल्यामुळे त्यांना कारागृहात ठेवण्यात आले होते. दरोडेखोरांनी कारागृहाचा दरवाजा तोडून पळ काढला. घायाळ पोलिसांवर वैद्यकीय उपचार करण्यात आले आहेत.
या घटनेमुळे सातारा पोलीस दल सक्रीय झाले असून पसार झालेल्या दरोडेखोरांच्या शोधासाठी पोलीस पथके पाठवली आहेत.
संपादकीय भूमिकादरोडेखोर कारागृह तोडून पळून जाणे पोलिसांसाठी लज्जास्पद ! कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांनी तर दरोडेखोरांना पळून जाण्यासाठी सहकार्य केले नाही ना ? असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ? अशा पोलिसांना कठोर शिक्षा करायला हवी ! |