ग्रंथलिखाणाचे अद्वितीय कार्य करणारे एकमेव परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !
सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारखे अत्युच्च कोटीतील संत सनातनचे ग्रंथ संकलित करत असल्याने ते ग्रंथ म्हणजे साक्षात् चैतन्याचे स्रोतच आहेत. ९ मे २०२२ या दिवशीच्या लेखात ‘ग्रंथसेवेच्या संदर्भात परात्पर गुरु डॉक्टरांचे घडलेले गुणदर्शन’ या पैलूंविषयी पाहिले. आज या लेखाचा उर्वरित भाग पाहूया.
लेखांक २ (भाग ३)
संकलक : (पू.) संदीप आळशी (सनातनच्या ग्रंथांचे एक संकलक), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
या लेखाचा आधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/578002.html
प्रस्तुत लेखमालेतील सर्व लेख साधकांनी संग्रही ठेवावेत. ग्रंथ प्रदर्शने, ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ इत्यादी प्रसंगी जिज्ञासूंचे प्रबोधन करण्यासाठी या लेखमालिकेत दिलेल्या माहितीचा उपयोग होईल. – संपादक
(या संदर्भातील विस्तृत लिखाण सनातनच्या आगामी ग्रंथात प्रकाशित करण्यात येणार आहे. – संपादक) |
२. ग्रंथसेवेच्या संदर्भात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे घडलेले गुणदर्शन !
२ क. द्रष्टेपण
२ क १. भावी भीषण आपत्काळाचा विचार काही वर्षे आधीच करून आपत्काळात जीवितरक्षणासाठी उपयुक्त असलेल्या विविध उपचारपद्धतींविषयीची माहिती संग्रहित करणारे एकमेव परात्पर गुरु डॉ. आठवले ! : ‘सध्या जगभर नैसर्गिक आपत्ती येत आहेत आणि भावी काळात त्या आणखी वाढतील. ‘आगामी तिसऱ्या महायुद्धात कोट्यवधी लोक अणूसंहारामुळे मृत्यू पावतील’, असे काही संत आणि द्रष्टे यांचे भाकीत आहे.
मुंबई येथील सेवाकेंद्रात रहात असल्यापासून परात्पर गुरु डॉक्टरांनी आयुर्वेद, योगासने, रेकी यांसारख्या विविध उपचारपद्धतींवरील पुष्कळ कात्रणे जमवून ठेवली होती. ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या ग्रंथ-निर्मितीचा उद्देश समाजाला अध्यात्म आणि साधना शिकवणे, हा असतांना त्यांनी इतक्या आधीपासून उपचारपद्धतींसारख्या विषयांवरील कात्रणेही का जमवून ठेवली होती ?’, याचा उलगडा मला (पू. संदीप आळशी यांना) वर्ष २०१३ मध्ये झाला. भावी तिसऱ्या महायुद्धकाळात डॉक्टर, वैद्य, औषधे आदी उपलब्ध होणे कठीण असतांना प्रत्येकाला स्वतःच स्वतःवर उपचार करता येणे आवश्यक ठरते. या दृष्टीने परात्पर गुरु डॉक्टरांनी वर्ष २०१३ मध्ये मला विविध उपचारपद्धतींविषयीची ‘भावी आपत्काळातील संजीवनी’ ही ग्रंथमालिका आरंभ करण्यास सांगितले. अनेक वर्षे आधीच जमवून ठेवलेल्या कात्रणांचा आता या ग्रंथमालिकेसाठी उपयोग होत आहे. (मार्च २०२२ पर्यंत या ग्रंथमालिकेतील २६ ग्रंथ प्रकाशित झाले आहेत.)
भावी काळात अखिल मानवजातीचे जीवितरक्षण व्हावे, यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींचा इतका आधीपासून विचार करणारे परात्पर गुरु डॉक्टर हे बहुधा पृथ्वीवरील एकमेव द्रष्टे असतील !
२ क २. साधकांचे भावी सेवाक्षेत्र आधीच ओळखून त्यांना त्यानुसार सिद्ध करणे
२ क २ अ. (पू.) संदीप आळशी
२ क २ अ १. वर्ष १९९५
अ. वर्ष १९९५ मध्ये मुंबई येथील सेवाकेंद्रात ग्रंथ-निर्मितीच्या सेवेला आरंभ झाला. तेव्हापासून परात्पर गुरु डॉक्टर मला अधिकाधिक ग्रंथांचीच सेवा करण्यास सांगायचे. मी ‘इलेक्ट्रॉनिक्स’ या अभियांत्रिकी शाखेत शिक्षण घेत होतो. इतर साधक वेगवेगळ्या सेवा शिकत होते आणि करतही होते. संगणकावर संरचनेची सेवा करायला मला आवडायचे. एकदा मी ती सेवा करत असलेले पाहून परात्पर गुरु डॉक्टरांनी मला माझी चूक दाखवून सांगितले, ‘‘तू ग्रंथांचे व्याकरण पडताळण्याचीच सेवा करायची.’’
हळूहळू माझ्या अन्य सेवा न्यून (कमी) होत जाऊन केवळ ग्रंथांचीच सेवा शेष (शिल्लक) राहिली. परात्पर गुरु डॉक्टरांना या सेवेच्या माध्यमातूनच माझी आध्यात्मिक प्रगती करवून घ्यायची होती, याचा उलगडा मला आता झाला.
२ क २ अ २. वर्ष १९९९ : ‘वर्ष १९९९ मध्ये पू. संदीप आळशी यांनी ‘सनातनची पत्रकारिता’ या ग्रंथासाठी मनोगत सिद्ध केले होते. हे त्यांनी लिहिलेले पहिलेच मनोगत होते. ते परात्पर गुरु डॉक्टरांना आवडले. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांनी सत्संगात एकदा उद्गार काढले, ‘‘प.पू. भक्तराज महाराज यांना त्यांच्या गुरूंनी ‘तू कितोबोंके उपर किताबे लिखेगा’, असा आशीर्वाद दिला होता. तो आशीर्वाद प.पू. बाबांनी मला दिला. आता सहस्रो ग्रंथांचे लिखाण करायचे आहे. संदीपने माझी ही चिंता दूर केली. तोच आशीर्वाद आता मी संदीपला देतो. या पुढच्या ग्रंथांचे लिखाण तोच करेल.’’ – सौ. अवनी संदीप आळशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(क्रमशः)
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अद्वितीयत्व दर्शवणारा एक पैलूविविध साधनामार्गांतील साधकांना मार्गदर्शन करणे ‘बहुतेक संतांचा त्यांच्या संप्रदायातील साधनामार्गाचा अभ्यास असतो. ते त्यावर आधारित काही ग्रंथही लिहितात. अशा ग्रंथांमुळे केवळ त्यांच्या साधनामार्गातील साधकांना मार्गदर्शन होते. परात्पर गुरु डॉ. आठवले हे विविध साधनामार्गांतील, उदा. नामसंकीर्तनयोग, भक्तीयोग, कर्मयोग, ध्यानयोग, ज्ञानयोग यांसारख्या विविध साधनामार्गांतील साधकांना त्यांच्या साधनेसाठी मार्गदर्शन करत आहेत. या समवेत ते विविध कलांच्या माध्यमातून, उदा. संगीतकला, चित्रकला इत्यादी माध्यमांतून साधना करणाऱ्या साधकांनाही मार्गदर्शन करत आहेत. त्यामुळे त्या क्षेत्रांतील साधकांची आध्यात्मिक प्रगतीही होत आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अशा विविध साधनामार्गांशी संबंधित ग्रंथही संकलित केले आहेत. सर्वसामान्य मनुष्याच्या तुलनेत त्यांच्या या कार्याची व्यापकता लक्षात घेतल्यावर यातून त्यांचे अद्वितीयत्वच लक्षात येते !’ – (पू.) संदीप आळशी (२५.११.२०२१) |