किनवट (जिल्हा नांदेड) येथे अल्पवयीन बालिकेवर अत्याचार केल्याप्रकरणी डॉक्टरला अटक !
नांदेड – किनवट येथील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी किनवट पोलिसांनी खासगी आधुनिक वैद्य विकास सुंकरवार (वय ४३ वर्षे) याला ७ मे या दिवशी अटक केली. ८ मे या दिवशी त्याला न्यायालयाने १२ मेपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. आधुनिक वैद्य विकास सुंकरवार यांच्या दवाखान्यात काम करण्यासाठी ही बालिका येत असे. ४ दिवसांपूर्वी तिला पोटात त्रास होत असल्याने तिच्या कुटुंबियांनी तिला रुग्णालयात नेले. त्या वेळी तेथील आधुनिक वैद्यांनी पडताळणी केली असता ती ४ मासांची गर्भवती असल्याचे निदर्शनास आले. उपचाराच्या वेळी तिचा गर्भपात झाला.
संपादकीय भूमिकाअल्पवयीन बालिकेचे आयुष्य उद्ध्वस्त करणारे डॉक्टर माणुसकीला कलंक आहेत. उच्चशिक्षित डॉक्टरांनी असे वागणे संतापजनक आणि लज्जास्पद आहे. अशा डॉक्टरांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे ! |